देवयानी फरांदेंवर गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांचा सत्कार; भाजप संतप्त

विना परवानगी मोर्चा काढल्याने भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांचा पोलीस आयुक्तांनी सत्कार केला आहे. (Police felicitation after case registered against BJP MLA Devyani Farande)

देवयानी फरांदेंवर गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांचा सत्कार; भाजप संतप्त
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 10:33 AM

नाशिक: विना परवानगी मोर्चा काढल्याने भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांचा पोलीस आयुक्तांनी सत्कार केला आहे. पोलीस आयुक्तांच्या या कृतीमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून भाजपमधूनही संताप व्यक्त केला जात आहे. (Police felicitation after case registered against BJP MLA Devyani Farande)

भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी पोलीस ठाण्यावर विना परवानगी मोर्चा काढला होता. त्यामुळे फरांदे यांच्याविरोधात बेकायदेशीर जमाव जमवल्याचा ठपका ठेवून पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांचा जाहीर सत्कार केला होता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून भाजपने मात्र पोलीस आयुक्तांच्या या कृतीवर संताप व्यक्त केला आहे. आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला म्हणून पोलिसांना प्रचंड आनंद झाला आहे का? असा सवाल भाजपमधून व्यक्त केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

नाशिकच्या वडाळा परिसरात एक डॉक्टर आणि स्थानिकांमध्ये वाद झाला होता. या वादात स्थानिक रहिवाशांपैकी एका जमावावर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत आमदार फरांदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांवरोधात मोर्चा काढण्यात आला. मात्र, यावेळी जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन झाल्याने पोलिसांनी आमदार देवयानी फरांदे यांच्यासह मोर्चात सहभागी झालेल्या 200 जणांवर गुन्हा दाखल केला. आमदार फरांदे यांच्या नेतृत्वाखाली ज्या आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता; तो तडीपार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याच कारणामुळे कठोर पाऊल उचलल्याच बोललं जातंय.

याआधीही देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वात महिला अत्याचाराविरोधात 12 ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्यात आला होता. इंदिरानगर परिसारात हा मोर्चा आल्यानंतर या ठिकाणी गोंधळ उडाला होता. यावेळी जमावबंदीचे आदेश असल्याचे सांगत आंदोलनकर्त्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, देवयानी फरांदे आणि पोलीस अधिकारी यांच्यात वाद निर्माण झाला होता. या वादामुळे इंदिरानगर परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. (Police felicitation after case registered against BJP MLA Devyani Farande)

त्यानंतर आता देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वात आरोपी इरफान शेख याच्या समर्थनार्थ इंदिरानगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यावर फरांदे कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Police felicitation after case registered against BJP MLA Devyani Farande)

संबंधित बातम्या:

आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणे भोवले, भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यावर गुन्हा

उद्धव ठाकरेंना 50 वर्ष मुख्यमंत्री राहण्यासाठी शुभेच्छा: देवेंद्र फडणवीस

शिवसेनेसोबत कायम राहायचंय, स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या, अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचना

(Police felicitation after case registered against BJP MLA Devyani Farande)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.