Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चोख बंदोबस्त; आजपासून पोलिसांचा खडा पहारा

CM Residence Security: ठाणे पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेतला आहे. एवढेच नाही तर सर्व विभागाचे अधिकारी सोयी-सुविधांसाठी तळ ठोकून आहेत.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चोख बंदोबस्त; आजपासून पोलिसांचा खडा पहारा
निवासस्थानी चोख बंदोबस्तImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 2:15 PM

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचे मुख्यमंत्री (State CM) म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आता त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या ठाणे (Thane) येथील निवासस्थानीही (Residence) पोलिसांनीही चोख (Police Security) बंदोबस्त ठेवला आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांच्या निवासस्थानी आता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ठाण्याचे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे,अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उबाळे,विशेष शाखा उपायुक्त सुधाकर पठारे,झोन 5 उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड,वाहतुक विभाग उपायुक्त दत्ता कांबळे यांनी त्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा आज आढावा घेतला. मुख्यमंत्री शिंदे यांचे निवासस्थान अति महत्वाचे ठिकाण म्हणून घोषीत करण्यात आले आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद गाठले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे हे कामाला लागले आहे. दरम्यान शिंदे यांच्या निवासस्थान आणि परिसरात सुशोभिकरण आणि अन्य सोयी-सुविधांसाठी पालिका कर्मचारी अधिका-यांनी धाव घेतली आहे. युद्धपातळीवर येथील कामांना पूर्ण करण्यात येत आहे.

बॅरिकेट्स लावणार

मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून शिंदे हे सक्रीय झाले असून त्यांच्या बंडाला साथ देणारे अनेक सहकारी अद्यापही मुंबईबाहेर गोव्यामध्ये आहे. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन त्यांना मुंबईत आणण्यात येणार आहे. तसेच खाते वाटपाचे ही नियोजन करण्यात येणार आहे. काल रात्री उशीरापर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात खलबते झाली. आता निष्ठावंतांना कोणती पदे मिळतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणाही कामाला लागल्या आहेत. त्यांनी शिंदे यांच्या ठाणे निवासस्थानाच्या सुरक्षेचा आढावा घेतला. ठाणे पोलीस आयुक्त आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराचा आढावा घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान अति महत्वाचे ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या बंगल्याच्या चारही बाजूला पोलीस तैनात करण्यात येणार आहे. तसेच या बंगल्याकडे येणा-या रस्त्यावर लवकरच बॅरिकेट्स लावण्यात येतील. सर्व एन्ट्री पॉईंट बंद करण्यात येतील. या ठिकाणी येणा-या प्रत्येकाची नोंद ठेवण्यात येणार आहे. तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमे-याची नजर राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

भर पावसात रस्त्याची डागडुजी

एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारताच कामाचा धडाका लावला आहे. त्यांच्या आक्रमक धोरणामुळे ठाणे येथील सुस्तावलेले प्रशासनही कामाला लागले आहे. अधिकारी आणि कर्मचा-यांनी निवासस्थान आणि आजुबाजूच्या परिसराचा सकाळपासूनच आढावा घेतला. त्यांनी पदभार स्वीकारताच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महानगरपालिका अधिका-यांची तारांबळ उडाली. बंगल्या शेजारच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. भर पावसात येथील रस्त्याची आणि परिसरातील काही भागाची डागडुजी करण्यात आली आहे. पावसाची उघडीप मिळताच या परिसरात डागडुजी आणि रंगरंगोटी करण्यात येणार आहे. मेट्रो रेल्वेच्या कामासाठी आणलेले साहित्य आणि पसारा ही उचलण्याच येत आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.