Nagpur Crime : नागपूरमध्ये हायप्रोफाईल पार्टीवर पोलिसांची धाड, मोठा मद्यसाठा जप्त

नाईट राउंडवर असलेल्या डीसीपी गजानन राजमाने यांनी या पार्टीवर रविवारी मध्यरात्रीनंतर धाड टाकली. यावेळी या पार्टीत डीजेच्या तालावर शेकडो तरुण-तरुणी नाचत होते. अचानक पोलिसांनी टाकलेल्या धाडीमुळे सर्वजण थबकले.

Nagpur Crime : नागपूरमध्ये हायप्रोफाईल पार्टीवर पोलिसांची धाड, मोठा मद्यसाठा जप्त
नागपूरमध्ये हायप्रोफाईल पार्टीवर पोलिसांची धाडImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 5:30 PM

नागपूर : खासगी ठिकाणी रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्टीवर नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई (Action) केली आहे. या पार्टीत मोठ्या प्रमाणात मद्यसाठा (Liquor Seized) पोलिसांनी जप्त केला आहे. शिवाय मद्यासोबत ड्रग्स (Drugs) देखील घेतले होते का याचाही तपास पोलीस करीत आहेत. हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत जामठा परिसरात ही पार्टी सुरु होती. ही विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत येथे धांगडधिंगा सुरु होता आणि स्थानिक पोलिसांना याची माहितीही नव्हती. पार्टीच्या आयोजकांवर कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. अशा प्रकारच्या पार्ट्यांचं आयोजन मोठ्या प्रमाणात होत असतं. त्यावर निर्बंध घालून त्याला कायद्याच्या चौकटीत आणण्याची गरज आहे.

विना परवानगी सुरु होती पार्टी

हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जामठा परिसरामध्ये रात्री उशिरापर्यंत एक पार्टी सुरु असल्याची माहिती डीसीपी गजानन राजमाने यांना मिळाली होती. नाईट राउंडवर असलेल्या डीसीपी गजानन राजमाने यांनी या पार्टीवर रविवारी मध्यरात्रीनंतर धाड टाकली. यावेळी या पार्टीत डीजेच्या तालावर शेकडो तरुण-तरुणी नाचत होते. अचानक पोलिसांनी टाकलेल्या धाडीमुळे सर्वजण थबकले. आयोजकांकडे पोलीस परवानगी नव्हती. केवळ परवानगी मागण्यासाठी दिलेला अर्ज होता. सोबतच लाऊड स्पीकर व मद्य वापराची परवानगी असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. त्याची पोलीस चौकशी करीत आहेत. पार्टीमध्ये ड्रग्स घेण्यात येत होते का याचाही तपास पोलीस करीत असल्याची माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पोलीस स्टेशन हद्दीत सुरु असलेल्या या पार्टीची स्थानिक पोलिसांना माहिती नव्हती. या कारणास्तव हिंगणा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. सोबतच आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचीही माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. (Police raid on high profile party in nagpur, liqour stock siezed)

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.