गणेशोत्सवासाठी पोलीस सज्ज, लेजर लाईटला बंदी तर 10 दिवस दारू बंदीचा प्रस्ताव

गणेशोत्सवसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यभरात उद्यापासून गणेशोत्सवाचा उत्सव सुरु होणार आहे. या उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनानेही तयारी केली आहे. राज्यभरात पोलिसांनी तयारी पूर्ण केली असून पुढचे दहा दिवस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काळजी घेतली जाणार आहे.

गणेशोत्सवासाठी पोलीस सज्ज, लेजर लाईटला बंदी तर 10 दिवस दारू बंदीचा प्रस्ताव
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 9:01 PM

गणेशोत्सव काळात पुण्यात 7 ते 12 तारखेपर्यंत रात्री 10 पर्यन्त लाऊडस्पीकर सुरु ठेवता येणार आहेत. तर 12 ते 17 तारखेपर्यंत म्हणजे पाच दिवस शहरात रात्री 12 वाजेपर्यन्त लाऊडस्पीकर सुरु ठेवण्यास परवानगी असेल. पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी टीव्ही 9 ला ही माहिती दिली आहे. गणेशोत्सव काळात सात हजार पोलिसांचा शहरात बंदोबस्त असणार आहे. गणेशोत्सव काळात 7, 16 आणि 17 तारखेला तीन दिवस शहरात दारू बंदी असणार आहे. तर फरासखाना, विश्रामबाग आणि खडक भागात 10 दिवस दारू बंदी करण्याचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात 756 आरोपीना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कोयता मिळणाऱ्या ठिकाणाचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

पुण्यात लेझर लाईटला बंदी

पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, गणेशोत्सवाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पुणे शहरात यंदा 3798 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. घरगुती गणपतीची संख्या 664257 इतकी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 1742 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सुमारे साडे सात हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. लेझर लाईटला बंदी असणार आहे. 10 क्युआरटी टीम्स तैनात असणार आहेत. सोशल मीडियावर काही आपत्तीजन्य पोस्ट टाकल्यास कारवाई केली जाणार आहे.

नाशिकमध्ये विशेष काळजी

नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले की, गणेशोत्सव काळात पोलीस तयार आहेत. 3 टप्प्यांत पोलीस बंदोबस्त असणार आहे. यासाठी 3 हजार पोलीस बंदोबस्त करणार आहेत. 1200 होमगार्ड देखील मदतीला असणार आहेत. 622 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. तर 324 गुन्हेगारांना हद्दपार केलं आहे. दंगलीच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली आहे. जुने नाशिक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे. 16 तारखेच्या दंगलीत चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान ठेवला आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी नागपूर पोलीस सज्ज आहे. गणेशोत्सवात सहा हजार पोलिसांचा राहणार बंदोबस्त असणार आहे. नागपुरात चौदाशे मंडळात बाप्पांची स्थापना होणार आहे. डीजे वाजवणाऱ्यांवर, कर्णकर्कश आवाज, गोंगाट घालणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या पोलीस आयुक्तांच्या सूचना आहेत. पोलिसांबरोबरच होमगार्ड देखील तैनात असणार आहेत. गणेश मंडळांना सीसीटीव्ही आणि स्वयंसेवक नियुक्त करण्याच्या पोलिसांच्या सूचना आहेत.

मुंबई पोलीस सज्ज

गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान सुरक्षा व्यवस्थेबद्दल, जॉइंट सीपी कायदा आणि सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले की, “मुंबई पोलिसांनी ‘गणपती आगमण’साठी पुरेशी व्यवस्था केली आहे. सर्व मार्गांवर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे आणि मंडप देखील सुरक्षित करण्यात आले आहेत. आम्ही बैठका घेतल्या आहेत. सर्व गणपती विसर्जनासाठी सीसीटीव्ही, ट्रॅफिक मॅनेजमेंट, 30 डीसीपी आणि सुमारे 2500 अधिकारी यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, इतर विशेष तुकड्याही तैनात केल्या आहेत.

'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य.
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?.
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?.
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’.
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?.
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.