‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’, मुंबईत ‘मराठी माणूस’ नको?

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी असं आपण अभिमानाने बोलतो. पण या मराठी भाषेबद्दल आणि मराठी भाषिकांबद्दल महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतच काही लोकांमध्ये द्वेष निर्माण झाल्याचं चित्र आहे. याबाबतचा प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियावर याचीच चर्चा सुरु आहे.

'आपुल्याच घरात हाल सोसते मराठी', मुंबईत 'मराठी माणूस' नको?
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 11:39 PM

मराठी-गुजरातीवरुन नोकरीचा मुद्दा काल मुंबईत तापला, त्यानंतर आता एका गुजरातीबहुल सोसायटीत ठाकरेंच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रोखल्याचा आरोप झालाय. ईशान्य मुंबईत भाजपकडून मिहिर कोटेचा तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय दिना पाटील उमेदवार आहेत. घाटकोपर भागात ठाकरेंचे समर्थक संजय पाटलांच्या प्रचारासाठी एका सोसायटीत गेले होते. त्यावेळी स्थानिक लोकांनी सोसायटीत प्रवेश करु न दिल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय. मराठी लोकांना आमच्या सोसायटीत प्रचार करु देणार नाही, असं आम्हाला सांगण्यात आल्याचा दावा ठाकरेंच्या समर्थकांनी केला. तर भाजपकडून या दाव्याला खोटं ठरवण्यात आलंय. काल घाटकोपरच्या सोसायटीबाहेर दोन्ही बाजूनं बाचाबाची झाल्यानंतर पोलिसांना मध्यस्ती करावी लागली, त्यानंतर वाद शांत झाला.

नुकतंच गिरगावात मराठी माणसांनी नोकरीसाठी अर्ज करु नयेत, अशी एका कंपनीनं दिलेली जाहिरात वादात सापडली होती. LinkedIn या नोकरीशी संबंधित वेबसाईटवर एक पोस्ट होती. ज्यात एका कंपनीसाठी ग्राफिक डिझायनर्सची जागा भरत असल्याचं सांगितलं गेलं. मात्र या नोकरीसाठी मराठी लोकांनी अर्ज करु नये, असंही जाहिरातीत म्हटलं गेलं होतं. गिरगाव हा मराठीबहुल भाग आहे. मात्र तिथल्याच नोकरीसाठी मराठी माणसं नकोत यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला. चहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर संबंधित कंपनीच्या एचआरनं माफीही मागितली.

एचआरने माफी मागताना काय म्हटलं?

एचआरनं म्हटलं की, “मी मनापासून माफी मागते. काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक डिझायनरसाठी एक पोस्ट टाकली होती. त्यातील एका आक्षेपार्ह वक्तव्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. कोणत्याही भेदभावाचं आम्ही समर्थन करत नाही. संबंधित गोष्ट ही माझ्या नजरचुकीमुळे झाली.” दोन दिवसातल्या या दोन घटनावरुन मात्र मुंबईतलं राजकारण तापलंय.

सोशल मीडियावर वातावरण तापलं

संबंधित एचआरच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर वातावरण तापलं आहे. सोशल मीडियावर एचआरच्या पोस्टवर नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित कंपनीच्या विरोधात कारवाई केली पाहिजे, असा प्रकार पुन्हा व्हायला नको यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी आता काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.