मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी चार दशके राजकारण गाजवणाऱ्या बड्या नेत्याची राजकीय संन्यासाची घोषणा, भावनिक वक्तव्य करत म्हटले…

Eknath Khadse Political retirement: मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव आले होते. परंतु त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर भाजपमध्ये एकनाथ खडसे यांचे स्थान कमी होऊ लागले. त्यांना सतत दुय्यम वागणूक दिली गेली. त्यामुळे त्यांनी २०२० मध्ये भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी चार दशके राजकारण गाजवणाऱ्या बड्या नेत्याची राजकीय संन्यासाची घोषणा, भावनिक वक्तव्य करत म्हटले...
eknath khadse
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 4:00 PM

Eknath Khadse Political retirement: महाराष्ट्रातील राजकारणात चार दशकांपासून कार्यरत असलेले पूर्वीश्रमीचे भाजप नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी सोमवारी मोठी घोषणा केली आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली. यापुढे कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. तसेच यावेळी भावनिक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले. पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार हे तो ईश्वरच ठरवेल, असे म्हणत त्यांनी मुलगी रोहिणी खडसे हिला विजयी करण्याचे आवाहन केले. खडसे यांनी जवळपास चार दशके जळगाव जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील राजकारण गाजवले. सभागृहातील त्यांची भाषणे प्रचंड गाजली होती.

काय आहे त्या व्हिडिओत

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, मी नाथाभाऊ बोलत आहे. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत रोहिणी खडसे राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. यापुढे मी निवडणूक लढवणार नाही. मी गेली अनेक वर्षे आपल्या सोबत आहे. गेली अनेक वर्षे आपण सर्वांनी मला सहकार्य केले आहे. कधी जात-धर्म न पाहता सर्वांना मदत केली आहे. प्रकृतीच्या कारणामुळे मी पुढची निवडणूक पाहणार की नाही, हे ईश्वरच ठरवेल. परंतु आपण मला जसे सहकार्य केले, तसे सहकार्य रोहिणी खडसे यांना करावे आणि निवडून आणावे, असे भावनिक आवाहन एकनाथ खडसे यांनी केले. यासंदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ एकनाथ खडसे यांनी शेअर केला.

हे सुद्धा वाचा

कोथडीचे सरपंच ते 12 खात्यांचे मंत्री

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत एकनाथ खडसे राज्यातील भाजपचा चेहरा होते. पक्षाला वाढवण्यात गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर खडसे यांचे मोलाचे योगदान होते. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दची सुरुवात कोथडी गावाचा सरपंच (१९८७) म्हणून केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही. आमदार, विरोधी पक्षनेते, १२ खात्याचे मंत्री अशी विविध पदे त्यांनी भूषवली. पक्षात त्यांनी अनेकांना मोठे केले. त्यांच्या शब्दाला दिल्लीपर्यंत किंमत होती.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव आले होते. परंतु त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर भाजपमध्ये एकनाथ खडसे यांचे स्थान कमी होऊ लागले. त्यांना सतत दुय्यम वागणूक दिली गेली. त्यामुळे त्यांनी २०२० मध्ये भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Non Stop LIVE Update
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्.