चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रदूषण वाढ, ‘या’ शहराला आहे सर्वाधिक धोका

कोरोना काळात उद्योग बंद असल्याने चंद्रपूरसह महाराष्ट्राच्या प्रदूषणात 30 ते 55 टक्क्याने घट झाली होती.

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रदूषण वाढ, 'या' शहराला आहे सर्वाधिक धोका
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 5:34 PM

चंद्रपूर : राज्यात लॉकडाऊनच्या काळात प्रदूषणाची पातळी घसरली असली तरी पुन्हा मिशन बिगीन अगेन सुरू झाल्याने प्रदूषण वाढू लागलं आहे. चंद्रपूर आणि घुगुस या दोन ठिकाणी सर्वाधिक प्रदूषणात वाढ झाल्याचं प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. या दोन शहरांसह राज्यातील 15 शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं या अहवालात आढळून आलं असून वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. (pollution has increased In Chandrapur district)

चंद्रपुरात असलेल्या कोळसा खाणी आणि वीज केंद्राच्या प्रदुषणामुळे चंद्रपूरच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. कोरोना काळात उद्योग बंद असल्याने चंद्रपूरसह महाराष्ट्राच्या प्रदूषणात 30 ते 55 टक्क्याने घट झाली होती. जानेवारी ते मार्च 2020 प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात चंद्रपूर व घुगुस या दोन शहराचा औद्योगिक शहरे प्रदुषित क्षेत्राच्या यादीत झळकली आहे.

सर्व प्रकारच्या वायू प्रदुषणात मुंबई आणि चंद्रपूर हे सर्वाधिक प्रदुषित विभाग ठरली आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाचा सन 2019-20 या वर्षाचा अहवाल जाहीर झाला आहे. मार्च महिन्यात देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने 25 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. दरम्यानच्या, काळात महाराष्ट्रासह देशातील उद्योग बंद होते. रेल्वे, वाहतूक बंदी होती. त्यामुळं उद्योगांची चाकं थांबली. गाड्याची चाकं थांबली. यामुळे वातावरण ढवळून निघालं होतं.

कोरोनाच्या काळात प्रदूषणात कमालीची घट दिसून आली. वायू आणि जल प्रदूषणातही घट झाली होती. पण आता चंद्रपूर जिल्ह्याच्या चारही बाजूंनी असलेल्या कोळसा खाणी, वीज केंद्र, सिमेंट प्रकल्प, कच्चा लोहनिर्मितीचे कारखान्यातून उत्पादन सुरू झालं आहे. अहवालानुसार, राज्यात 25 शहरात 84 वायू गुणवत्ता मापन केंद्र आहेत. त्यातील 23 केंद्र सतत वायू गुणवत्ता मापन करतात. त्यात सर्वाधिक मुंबई आणि त्या खालोखाल 8 चंद्रपुरात आहे.  (pollution has increased In Chandrapur district)

चंद्रपूर इथं सल्फरडायऑक्साईडचे मर्यादेपेक्षा अधिक आढळलं आहे तर नायट्रोजन ऑक्साईडचंही प्रमाण अधिक आहे. ओझोनचे प्रमाणही मर्यादेपेक्षा अधिक असल्याची माहिती देण्यात आली आहे. चंद्रपूर व घुगुस इथं उद्योग, कोळसा ज्वलन, विविध वायू ज्वलन, वाहतुक, वाहने, कचरा, कचरा ज्वलन, बांधकाम, रस्त्याची धुळ आणि घरगुती प्रदुषण ही वायू प्रदूषणाची प्रमुख स्त्रोत ठरली आहेत.

घुग्घुस इथं सभोवताल कोळशाच्या खाणी, सिमेंट उद्योग आणि आयर्न ओरचे कारखाने आहेत. धुळीकरणांच्या प्रदूषणात घुगुस व चंद्रपूर धोकादायक स्थितीत आहे. अशात काम करणं आणि राहणं नागरिकांच्या धोक्याचं होत चाललं आहे. त्यामुळे यावर वेळीच पाऊलं उचलणं महत्त्वाचं आहे.

इतर बातम्या –

सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे नवी जबाबदारी, सदस्‍यपदी असणार ‘हे’ बडे नेते

“आता एकच अजेंडा…” काँग्रेसप्रवेशानंतर उदयसिंह पाटलांचा निर्धार, पृथ्वीबाबा-विलासकाका एकत्र

(pollution has increased In Chandrapur district)

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.