AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राठोड यांची हकालपट्टी करा, पूजा चव्हाण प्रकरणावरुन अतुल भातखळकर आक्रमक

वनमंत्री संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे. (Pooja Chavan sucide case Atul Bhatkhalkar)

संजय राठोड यांची हकालपट्टी करा, पूजा चव्हाण प्रकरणावरुन अतुल भातखळकर आक्रमक
अतुल भातखळकर, पूजा चव्हाण, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 11:05 AM

मुंबई : “या राज्यात महिला सुरक्षित तर नाहीयेतच. पण राज्यातील महिला या मंत्र्यांपासूनसुद्धा सुरक्षित नाहीयेत. वनमंत्री संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करावी. या समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती, पोलीस अधिकारी असावेत,” अशी आग्रही मागणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. याच प्रकरणावर ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी वरील मागणी केली. (Pooja Chavan sucide case Atul Bhatkhalkar said that Government is trying to protect the suspect)

आरोपींना मुख्यमंत्र्यांकडून वाचवण्याचं काम

यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारव जोरदार टीका करत या प्रकरणाची चौकशी सरण्याची मागणी केली. “या प्रकरणात समोर आलेल्या ऑडिओ क्लीप ताब्यात घेतल्या पाहिजेत. त्या ऑडिओ क्लिप फॉरेन्सिककडे पाठवून तो आवाज कोणाचा आहे?, हे तपासले पाहिजे. लॅपटॉही स्कॅन केला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच, या सर्व तपासाच्या गोष्टी असून, गुन्हेगारांना वाचवण्याचं पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

संजय राऊत गप्प का?

यावेळी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना भातखळकर यांनी शिवसेनेचे खासदर संजय राऊत यांच्यावरही घणाघाती टीका केली. “माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांच्यावर आरोप झाले तेव्हा संजय राऊतांनी अग्रलेख लिहिले. त्यानंतर भाजपने त्यांचा राजीनामा घेतला. आता संजय राऊत कुठे गेले आहेत? हा त्यांचा दुतोंडीपणा आहे,” असे भातखळकर म्हणाले. तसेच, यावेळी अत्यंत बदनाम लोकांचं राज्य राज्यात कार्यरत असल्याचे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला.

दरम्यान, या प्रकरणाची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. उद्धव ठाकरे हे वनमंत्री संजय राठोड यांचीही बाजू ऐकून घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  त्यानंतरच मुख्यमंत्री पुढील कारवाई करणार असल्याचे संकेत मिळत आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.

कोणत आहेत संजय राठोड?

  • संजय राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील बडे नेते आहेत
  • शिवसेनेचे नेते संजय राठोड हे पहिल्यांदा 2004 साली यवतमाळमधील दिग्रस विधानसभा मतदार संघातून विजयी झाले.
  • त्यानंतर 2009 आणि 2014 अशा दोन्ही वेळा पुन्हा संजय राठोड आमदार म्हणून विधानसभेत गेले.
  • फडणवीसांच्या 2014 साली राठोड यांच्याकडे यवतमाळच्या सहपालकमंत्रिपदासह महसूल राज्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली.
  • 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा, त्यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला.
  • संजय धुळीचंद राठोड हे महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत.
  • ते दिग्रस विधानसभा मतदार संघातून 2004 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते.
  • 2009 मध्ये पुन्हा निवडून आले.
  • 2014 मध्ये त्यांची महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यांना महसूल विभाग देण्यात आला.
  • यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची जबाबदारीदेखील देण्यात आली.
  • 30 डिसेंबर 2019 रोजी त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते.
  • आताच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे वनमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी ठाकरे सरकारवर दबाव वाढला, राठोडांची विकेट पडणार?

मलाच जीव द्यावा लागेल, असं कथित मंत्री का म्हणाला?; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गळ्याचा फास ठरणार?

(Pooja Chavan sucide case Atul Bhatkhalkar said that Government is trying to protect the suspect)

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.