पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : अरुण राठोडनेच स्थानिकांपर्यंत ऑडिओ क्लिप पोहोचवल्या
घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या अरुण राठोडने या क्लिप स्थानिकांना दिल्या. (Pooja chavan suicide case : Arun rathod viral all Audio clip)
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील अरुण राठोड या तरुणाचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. पूजा आत्महत्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. मात्र या ऑडिओ क्लिप पोलिसांपर्यंत नेमक्या कशा पोहोचल्या याची काही उलगडा होत नव्हता. पण या सर्व ऑडिओ क्लिप अरुण राठोडने स्थानिकांना दिल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. (Pooja chavan suicide case : Arun rathod viral all Audio clip)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली, त्यावेळी तिघे जण घटनास्थळी उपस्थित होते. यात एक पूजा चव्हाण होती. तर इतर दोघेजण त्या ठिकाणी उपस्थित होते. जोपर्यंत पोलीस घटनास्थळी उपस्थितांना शेजाऱ्यांनी पकडून ठेवलं होतं. त्यानंतर पूजाला रुग्णालयात नेण्यात आलं. यानंतर स्थानिकांनी अरुण राठोडवर प्रश्नांचा भडिमार केला. त्यावेळी घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या अरुण राठोडने या क्लिप स्थानिकांना दिल्या.
अरुण राठोडवर स्थानिकांकडून प्रश्नांचा भडिमार
यात मंत्र्यांचा वारंवार फोन येत होता. याबाबतचे पुरावे मी स्वत:कडे ठेवले आहेत. त्यावेळी त्याच्याकडे पुराव्यांची मागणी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी सरेंडर होत याची पूर्ण माहिती समोरच्या व्यक्तीला दिली. पोलिसांनाही हे प्रकरण लक्षात आलं आणि तपास मंदावला.
आठवड्याभरात याप्रकरणी काहीही खुलासे झालेले नाही. मात्र आता गेल्या दोन दिवसात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. विशेष म्हणजे अद्याप मृत मुलीचा मोबाईल किंवा लॅपटॉप अद्याप कोणालाही सापडलेला नाही. या दोन्ही गोष्टी ताब्यात घेण्यासाठी वारंवार सांगण्यात येत होतं. यानुसार ज्या दिवशी पूजाचा मृत्यू झाला त्याच दिवशी स्थानिकांनी अरुण राठोडवर प्रश्नांचा भडिमार केला. या भडिमारात अरुण राठोड सरेंडर झाला. त्याच अवस्थेत त्याने या क्लिप दिल्या, अशी माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.
विशेष म्हणजे यवतमाळमध्ये 2 फेब्रुवारीला रुग्णालयात उपचार घेत असलेली व्यक्ती पूजा चव्हाणच होती, असेही समोर आले आहे. पूजाने रुग्णालयात वेगळ्या नावाने नोंद केली होती.
नेमकं प्रकरणं काय?
पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या.
राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. या घटनेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाला ट्विटरवर टॅग करण्यात आलं होतं. यावेळी याप्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती करण्यात आली होती. या विनंतीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी याबाबत दखल घेतली आहे.
अरुण राठोडचा पोलिसांचा शोध सुरु
अरुण राठोड या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पुण पोलिसांकडून सध्या अरुण राठोडचा शोध सुरु आहे. अरुण राठोड हा सध्या बीडमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप याची कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
भाजपकडून थेट वन मंत्र्याचं नाव
भाजपने थेट शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं या प्रकरणात नाव घेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. (Pooja chavan suicide case : Arun rathod viral all Audio clip)
संबंधित बातम्या :
भाऊ, पूजा ताई र आत्महत्या छ कि घात पात हाई?; फेसबुकवर राठोडांना नेटकऱ्यांचा सवाल
कोण आहे अरुण राठोड? जो सातत्यानं पूजा आणि मंत्र्यांच्या संपर्कात होता?