वाशिम: बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी संस्थानच्या महंतांची आज बैठक पार पडली. यावेळी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांचं लक्ष्य ठरलेले बंजारा समाजाचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विरोधकांनी समाजाची बदनामी केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. (Pooja Chavan Suicide Case: banjara samaj hold meeting in washim)
पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. याप्रकरणात राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपकडून आरोप करण्यात आले. तसेच या प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी होत असल्याने बंजारा समाजाची वाशिममधील पोहरादेवी संस्थान येथे आज दुपारी 12 वाजता महत्त्वाची बैठक पार पडली. बंजारा समाजाचे धर्मगुरू स्वर्गीय रामराव महाराज यांचे धर्मपिठाधिश्वर बाबूसिंग महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीला संत सेवालाल महाराज ट्रस्टचे अध्यक्ष कबिरदास महाराज, सुनील महाराज, जितेंद्र महाराज आणि महाराष्ट्र अखिल भारतीय बंजारा समाजाचे अध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
पूजाला न्याय मिळावा, पण…
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलंच गाजत असून विरोधक आक्रमक झाले आहेत. मात्र यावेळी सर्वच महंतांनी संजय राठोड यांचे समर्थन केले आहे. सर्व समाज संजय राठोड यांच्या पाठीशी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पूजा चव्हाणने केलेली आत्महत्या दुर्दैवी असून पूजाला न्याय मिळाला पाहिजे. मात्र ऑडिओ क्लिपच्या नावाखाली समाजाचे नेते संजय राठोड याना बदनाम केल्या जात आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी केल्यानंतर सत्य समोर येणार असून देशातील संपूर्ण समाज राठोड यांच्या पाठीशी आहे, असं बाबूसिंग महाराज धर्मपिठाधीश्वर यांनी सांगितलं.
जिल्हाधिकारी, तहसीलदारांना निवेदन देणार
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विरोधी पक्ष आक्रमक होत आहे. मात्र हे प्रकरण येथेच थांबले नाही तर राज्यातील सर्वच समाज रस्त्यावर उतरून तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना 15,16,17 फेब्रुवारी रोजी निवेदन देऊन विरोधकांचा निषेध नोंदवणार असल्याचं सुनील महाराज यांनी सांगितलं.
क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचा नाही
बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांड्यातील गावकऱ्यांनी क्लिपमधील संजय राठोड आणि अरुण राठोड यांच्या आवाजाबाबत शंका उपस्थित केली आहे. हा आमच्या नेत्याचा आवाजच नाही, असं या गावकऱ्याचं म्हणणं आहे. तर आमच्या समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असून ही बदनामी आम्ही खपवून घेणार नाही, असं या गावकऱ्यांनी सांगितलं. (Pooja Chavan Suicide Case: banjara samaj hold meeting in washim)
सखोल चौकशी करा
गावातील महिलांनीही या प्रकरणावर त्यांचं मत मांडलं. पूजा आमच्या समाजाची आहे. तिच्यावर अन्याय होऊ नये. ऑडिओ क्लिपची कसून चौकशी करा. समजाला बदनाम करू नका. आमचा कायद्यावर विश्वास आहे. पुरावा असेल तरच बोला. पुराव्याशिवाय कुणीही समाजाची बदनामी करू नये, असं या महिलांचं म्हणणं आहे. संजय राठोड हे आमच्या समाजाचे नेते आहेत. आमच्याकडे तेवढाच नेता आहे. त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आमची कळकळ आहे, असंही या महिलांनी सांगितलं. (Pooja Chavan Suicide Case: banjara samaj hold meeting in washim)
संबंधित बातम्या:
भाऊ, पूजा ताई र आत्महत्या छ कि घात पात हाई?; फेसबुकवर राठोडांना नेटकऱ्यांचा सवाल
कोण आहे अरुण राठोड? जो सातत्यानं पूजा आणि मंत्र्यांच्या संपर्कात होता?
मुख्यमंत्र्यांनी क्लिप नीट ऐकाव्या म्हणजे कळेल की कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय: देवेंद्र फडणवीस
(Pooja Chavan Suicide Case: banjara samaj hold meeting in washim)