पूजाने आत्महत्या केली की गॅलरीतून ढकलले?; मद्याच्या बाटल्यांनी गुंता वाढला

पूजा चव्हाणच्या आत्महत्येबाबतचा पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. (Pooja Chavan suicide case: Pooja Chavan fell from the gallery or someone pushed?)

पूजाने आत्महत्या केली की गॅलरीतून ढकलले?; मद्याच्या बाटल्यांनी गुंता वाढला
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 7:44 AM

पुणे: पूजा चव्हाणच्या आत्महत्येबाबतचा पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. या तपासात अनेक नवनवीन गोष्टी पुढे येत असल्याने या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढला आहे. पूजाच्या घरात मद्याच्या बाटल्या सापडल्याने पूजा नशेत होती का? नशेतच ती गॅलरीतून पडली की तिला कुणी ढकलले? असे प्रश्न निर्माण झाले असून दिशेनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Pooja Chavan suicide case: Pooja Chavan fell from the gallery or someone pushed?)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा पुणे पोलीस तपास करत आहे. पोलिसांनी पूजाच्या घराची तपासणी केली असता तिच्या घरात मद्याच्या 4 बाटल्या सापडल्या. त्यातील अडीच बाटल्या रिकाम्या होत्या. त्यावरून घरातील व्यक्तींनी मद्य प्राशन केल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, पूजाने मद्य प्रशान केले होते की नाही या बाबतचा अद्याप उलगडा झालेला नाही. परंतु, मद्याच्या बाटल्या सापडल्याने पूजाचा मद्याच्या नशेत गॅलरीतून तोल तर गेला नाही ना? किंवा तिला नशेत कुणी ढकलून तर दिले नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी यबाबतच्या कोणत्याही बाबींना दुजोरा दिला नाही, मात्र त्या दिशेने तपास सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

संभाषण काय सांगतं?

दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित कथित 11 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यात मद्य प्राशनाचा कुठेही उल्लेख नाही. शिवाय अरुण राठोड हा कथित मंत्र्याला पूजाचा पडून मृत्यू झाल्याचं सांगतो. इमारतीच्या खाली सिमेंटचा रस्ता आहे. पडल्यामुळे रस्त्यावर डोकं आदळल्याने तिचा मृत्यू झाल्याचं तो कथित मंत्र्याला सांगतो. पोलिसांनीही या अरुण नावाच्या व्यक्तीची रुग्णालयात जबानी घेतली असता त्यातही तो तेच सांगतो. शिवाय ती पडल्यानंतर आम्हाला कळल्याचंही तो सांगतो. यावरून पूजाने गॅलरीतून उडी घेतली तेव्हा गॅलरीत ती एकटीच होती, असा अंदाज निघत असल्याचं दिसून येतं.

मंत्री म्हणाला चक्कर येऊन पडली म्हणून सांगा

या क्लिपमध्ये कथित मंत्री आणि विलास (पूजाचा कथित भाऊ) यांचे संभाषण आहे. पूजाच्या मृत्यूनंतरच्या संभाषणात काय स्टेटमेंट द्यायची हे हा मंत्री विलासला सांगताना दिसत आहे. कुणी विचारलं तर आम्ही झोपलो होतो. ती चक्कर येऊन पडली, असं सांग असं मंत्री विलासला सांगतात. त्यावर माझी सांगायची हिंमत होत नसल्याचं विलास म्हणतो. पण तरीही मंत्री त्याला चक्कर येऊन पडल्याचं सांग म्हणून सांगतात. गॅलरीतून बॅलन्स गेला, चक्कर आली, असंही सांगतात. शेवटच्या क्लिपमध्येही मंत्री अरुणला मोबाईल ताब्यात घ्यायला सांगतात. क्लिपमधील या संभाषणातून पूजाच्याबाबतीत नेमकं काय झालं? नेमकं काय लपवलं जातयं? अशीही शंका उपस्थित केली जात आहे.

आत्महत्या नैराश्यातून

पूजाने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पोलिसांच्या पंचनाम्यानुसार पूजाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. तर पूजाच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी शवविच्छेदन अहवालातील मोजकीच माहिती मीडियाला दिली आहे.

दोन्ही तरुणांवर गुन्हा नोंद नाही

पूजाने रविवार 7 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. आज या घटनेला आठवडा पूर्ण होत आहे. मात्र, अद्यापही पूजाच्या आत्महत्येप्रकरणी कुणालाही अटक करण्याता आली नाही. तसेच कुणावरही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. पोलिसांनी तिच्यासोबत राहणाऱ्या दोन्ही तरुणांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे गुन्हा नोंदवता येत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. ही तांत्रिक अडचण काय आहे हे मात्र पोलिसांनी स्पष्ट केलं नाही.

कुटुंबीयांची तक्रार नाही

दरम्यान, पूजाच्या कुटुंबीयांनी पूजाच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी कुणावरही संशय व्यक्त केला नसून कुणाच्याही विरोधात गुन्हा दाखल केलेला नाही. पूजाचे कुटुंबीय बीड जिल्ह्यातील परळी येथे राहतात. (Pooja Chavan suicide case: Pooja Chavan fell from the gallery or someone pushed?)

महिला आयोगाकडून दखल

पूजा आत्महत्या प्रकरणात रोज नवी माहिती येत असल्याने राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. आयोगाने पोलिसांना पत्र पाठवले असून या प्रकरणाचा कसून तपास करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. (Pooja Chavan suicide case: Pooja Chavan fell from the gallery or someone pushed?)

संबंधित बातम्या:

कोण आहे अरुण राठोड? जो सातत्यानं पूजा आणि मंत्र्यांच्या संपर्कात होता?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : अरुण राठोडचा शोध सुरु, बीडमध्ये लपल्याची माहिती

पूजा चव्हाणप्रकरणी मुख्यमंत्री ठाकरी बाणा दाखवणार का?; प्रवीण दरेकरांचा सवाल

(Pooja Chavan suicide case: Pooja Chavan fell from the gallery or someone pushed?)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.