… तर राठोड यांनी मंत्रिपदासह आमदारकीचाही राजीनामा द्यावा; पोहरादेवीतून मुख्यमंत्र्यांना ई-मेल जाणार

| Updated on: Feb 28, 2021 | 12:25 PM

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकारवर विरोधकांचा दबाव वाढला आहे. (Pooja Chavan Suicide Case: we will send e-mail to cm uddhav thackeray says jitendra maharaj)

... तर राठोड यांनी मंत्रिपदासह आमदारकीचाही राजीनामा द्यावा; पोहरादेवीतून मुख्यमंत्र्यांना ई-मेल जाणार
संजय राठोड, वन मंत्री
Follow us on

वाशिम: वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकारवर विरोधकांचा दबाव वाढला आहे. त्यामुळे राठोड कोणत्याही क्षणी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यता येत असतानाच पोहरादेवीतील महंतांनी मात्र राठोड यांच्या राजीनाम्याला विरोध केला आहे. जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत राठोड यांचा राजीनामा घेऊ नये, असं सांगतानाच राठोड यांना राजीनामा देण्याची वेळ आलीच तर त्यांनी केवळ मंत्रिपदाचा राजीनामा न देता आमदारकीचाही राजीनामा द्यावा, अशी भूमिका महंतांनी व्यक्त केली आहे. (Pooja Chavan Suicide Case: we will send e-mail to cm uddhav thackeray says jitendra maharaj)

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तर दुसरीकडे राठोड यांचा राजीनामा घेऊ नये म्हणून बंजारा समाजातील धर्मगुरुंनी दबाव वाढवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महंत काय म्हणतात?

पोहरादेवीच्या महंतांनी राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीला विरोध केला आहे. चौकशी झाल्याशिवाय आणि त्यातून काही निष्पन्न झाल्याशिवाय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय देऊ नये, असं महंत जितेंद्र महाराज यांनी सांगितलं. मात्र, उद्या राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आलीच तर त्यांनी मंत्रिपदासह आमदारकीचाही राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी जितेंद्र महाराज यांनी केली आहे. या प्रकरणाची चौकशी न होता आणि त्यांची आरोपातून मुक्तता न होता राजीनामा घेतला जात असेल तर आमचा त्याला विरोध आहे. आधी चौकशी होऊ द्या नंतरच काय तो निर्णय घ्या, असंही जितेंद्र महाराज यांनी सांगितलं.

क्लिपचा तर अहवाल येऊ द्या

पूजा चव्हाण प्रकरणातील 12 ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं आम्हाला कळालं आहे. या लॅबचा अहवाल येईपर्यंत तरी राठोड यांचा राजीनामा घेऊ नये, असं सांगतानाच राठोड हे आमच्या समाजाचे लोकप्रिय नेते आहेत. पण म्हणून आम्ही सरकारवर दबाव वाढवतोय असा त्याचा अर्थ नाही, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना मेल पाठवणार

राठोड यांचा राजीनामा घेऊ नये म्हणून आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोहरादेवीतून ई-मेल पाठवणार आहोत. आज दुपारी मुख्यमंत्र्यांना हे मेल पाठवण्यात येणार आहेत. कोणत्याही चौकशीशिवाय सरकारने कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. राठोड यांच्यावर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे, असंही त्यांनी सांगितलं. राठोड यांच्या जवळच्या लोकांचे आम्हाला फोन आले होते. त्यानुसार राठोड आज किंवा उद्या रात्री पोहरादेवीला येणार असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं, असंही त्यांनी सांगितलं.

राठोड यांना सल्ला देणार

मुख्यमंत्र्यांना ई-मेल पाठवल्यानंतर त्यावर त्यांचं काय उत्तर येतं ते पाहू. त्यानंतर सर्व महंतांची बैठक होईल. त्यात राठोड यांनी काय करायचं याचा त्यांना सल्ला दिला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (Pooja Chavan Suicide Case: we will send e-mail to cm uddhav thackeray says jitendra maharaj)

 

संबंधित बातम्या:

मोठी बातमी ! आधी मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर पोहरादेवीला जाणार, संजय राठोड यांचं ठरलं

राठोडांच्या राजीनाम्यावरुन भाजप आक्रमक; महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक, आज मोठ्या घडामोडी घडणार

आता कोणत्याही क्षणी संजय राठोड यांची विकेट, संजय राऊत यांचे सूचक ट्विट

(Pooja Chavan Suicide Case: we will send e-mail to cm uddhav thackeray says jitendra maharaj)