राज्यात सरकारी बदल्यांना स्थगिती, 30 जूनपर्यंत कोणतीही प्रशासकीय बदली नाही, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

आता पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत प्रशासनातील एकही बदली होणार नाहीये. अगदीच तातडीची बदली असेल ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनेच करणे शक्य होणार आहे. राज्य सरकारकडून याबाबतचे परिपत्रक आज जारी करण्यात आले आहे.

राज्यात सरकारी बदल्यांना स्थगिती, 30 जूनपर्यंत कोणतीही प्रशासकीय बदली नाही, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
No transfer upto 30 JuneImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 8:27 PM

मुंबई – बदल्यांसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी किंवा बदल्यांच्या प्रतीक्षेत असलेल्यांना आता आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. राज्य सरकारने (Maharashtra Government)याबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घएतला आहे. ३० जूनपर्यंत (upto 30 June) राज्यात एकही सरकारी बदली करु नये, (No government transfer)असे आदेशच राज्य सरकारने काढले आहेत. त्यामुळे आता पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत प्रशासनातील एकही बदली होणार नाहीये. अगदीच तातडीची बदली असेल ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनेच करणे शक्य होणार आहे. राज्य सरकारकडून याबाबतचे परिपत्रक आज जारी करण्यात आले आहे.

काय लिहिले आहे या परिपत्रकात

यात लिहिले आहे की- महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ नुसार करण्यात येणाऱ्या बदल्या २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षी ३० जून २०२२ पर्यंत करण्यात येऊ नयेत. परंतु, प्रशासकीय कारणास्तव तातडीने एखादी बदली करणे आवश्यक असल्यास अशी बदली मुख्यमंत्र्यांच्या मान्येतेने करावी.

हे सुद्धा वाचा

कोरोनाकाळापासून बदल्या स्थगित

राज्यात वाढलेल्या कोरोना संक्रमाणामुळे, गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याही शासकीय बदल्या झालेल्या नाहीत. आता या निर्णयामुळे बदल्यांची प्रक्रिया आणखी एक महिना लांबणीवर पडलेली आहे. बदल्या तूर्तास करु नये, याबाबतची मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्याची माहिती आहे. दोन वर्षे बदल्या न झालेले अनेक शासकीय कर्मचारी सध्या बदली कधी होणार या प्रतीक्षेत आहेत, अनेकांना त्यांच्या हव्या त्याठिकाणी बदली मिळणार का, याकडेही त्यांचे लक्ष आहे. अशा स्थितीत आता बदल्या लांबणीवर पडल्याने आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.