Mumbai Power Cut : मुंबईत अनेक भागांतील वीज गुल; मुसळधार पावसाचा जोर कमी होईना

यंदाच्या हंगामात मुंबई शहर व उपनगरांत पहिल्यांदाच रेकॉर्डब्रेक पावसाचे धुमशान सुरू आहे. या पावसाने रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा खोळंबा केला असतानाच आता अनेक भागांतील वीजेच्या पुरवठ्यावरही परिणाम होऊ लागला आहे. गुरुवारी रात्री मुसळधार पावसामुळे दादर, शिवाजी पार्क, अँटॉप हिल आणि सायनमधील भागांसह शहराच्या अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला.

Mumbai Power Cut : मुंबईत अनेक भागांतील वीज गुल; मुसळधार पावसाचा जोर कमी होईना
सांगली जिल्ह्यात 5 लाख 50 हजारांची वीजचोरी उघडImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 7:40 PM

मुंबई : मुंबई शहर व उपनगरांत शुक्रवारी सलग दुसर्‍या दिवशी मुसळधार पावसाचे थैमान सुरू राहिले आहे. या मुसळधार पावसा (Heavy Rain)ने मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत केले असून शहर व उपनगरांतील अनेक भागांत विजपुरवठा (Power Supply)ही खंडित झाला आहे. आधीच बाहेर पावसामुळे दिवसाही अंधाराचे साम्राज्य आहे. त्यात घरातील वीज गुल झाली आहे. त्यामुळे बर्‍याच भागांतील मुंबईकरांची प्रचंड गैरसोय झाली आहे. अँटॉप हिल आणि सायन येथील काही इमारतींमध्ये रात्रभर वीज खंडित (Power Outage) झाला. परिणामी, अनेक रहिवाशांची, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. पावसाने हवेत गारवा आणला असला तरी आर्द्रतेचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे वीजेअभावी उकाड्यानेही नागरिक हैराण झाले. त्याचबरोबर अनेक छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांवरही खंडित वीजपुरवठ्याचा मोठा परिणाम झाला आहे. व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

मुसळधार पावसामुळे बत्ती गुल

कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीलगतच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यंदाच्या हंगामात मुंबई शहर व उपनगरांत पहिल्यांदाच रेकॉर्डब्रेक पावसाचे धुमशान सुरू आहे. या पावसाने रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा खोळंबा केला असतानाच आता अनेक भागांतील वीजेच्या पुरवठ्यावरही परिणाम होऊ लागला आहे. गुरुवारी रात्री मुसळधार पावसामुळे दादर, शिवाजी पार्क, अँटॉप हिल आणि सायनमधील भागांसह शहराच्या अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. रात्रीच्या वेळी घरात पंखा किंवा लाईट नसल्यामुळे मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. अनेक इमारतींच्या लिफ्टही वीजेअभावी बंद झाल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोईंचा सामना करावा लागला. पावसाळ्यात केबल्स तुटतात. त्यामुळे अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो, असे बेस्टच्या अधिकार्‍यांनी सांगितले. दुसरीकडे पूर्व उपनगरात घाटकोपर, मुलुंड, विक्रोळी आणि अंबरनाथसारख्या काही दूरच्या उपनगरांसह शहरातील इतर भागांमध्येही वीजपुरवठा खंडित झाला. (Power outages in many parts of Mumbai due to heavy rains)

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.