‘तितकेच लोक तुमच्या विरोधात जातील’, प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांना सुनावलं

तुम्ही जितकी टीका कराल लोक तितकेच तुमच्या विरोधात जातील आणि आमच्या बाजूने उभे राहतील, अशा शब्दांत प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सुनावलं. प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली.

'तितकेच लोक तुमच्या विरोधात जातील', प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांना सुनावलं
प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले
Follow us
| Updated on: Aug 14, 2024 | 5:31 PM

महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लाडकी खुर्ची योजना’ आहे, अशी टीका केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही जितकी टीका कराल तितकेच लोक तुमच्या विरोधात जातील आणि आमच्या बाजूने उभे राहतील, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. तर लाडकी बहीण योजना ही अत्यंत चांगली आणि कायमस्वरूपी योजना आहे. त्यामुळे आमच्या विरोधकांच्या पोटात दुखायला लागलंय, असाही टोला प्रफुल्ल पटेल यांनी लगावला.

आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महायुतीमध्ये जागा वाटपावरून दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. यावर राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता, “ज्या पक्षाची जिथे जास्त ताकद असेल तिथे त्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट देण्यात येईल. मी माझ्या पक्षाचा एक प्रमुख म्हणून गेल्या 20 वर्षांपासून अनेक पक्षांसोबत अशा वाटाघाटीमध्ये सहभागी राहिलेलो आहे. त्यामुळे सुरुवातीला असं वाटत असते. पण आम्हाला महाराष्ट्राचं भलं करायचं आहे. त्यामुळे आम्ही सर्व एकत्र लढू आणि त्याच्यासाठी आम्ही योग्य मार्ग काढू”, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

‘रोहित पवार त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते’, प्रफुल्ल पटेल यांचा टोला

“भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडून अजित पवारांवर सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीसाठी दबाव आणण्यात आला होता. तसाच दबाव विधानसभेमध्ये माझ्या मतदारसंघात आणणार आहेत”, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले आहे. यावर प्रफुल्ल पटेल यांनी “रोहित पवार हे त्यांच्या पक्षाचे जेष्ठ नेते झालेले आहेत. याच्यावर त्यांच्या पक्षाच्या लोकांनी बोललं पाहिजे”, असे म्हणत अधिक बोलणं टाळलं.

‘तो चुनावी जुमला होता’

नाशिकमधून सुरू झालेल्या जनसन्मान यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. दोन दिवस मंत्रालयाचं काम करून बाकी पाच दिवस या यात्रेमध्ये आम्ही फिरणार आहोत. सरकारने सुरू केलेल्या योजनांची जनजागृती करणार आहोत. तर लोकसभेमध्ये जो विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह सेट केला होता तो लोकांना आता समजलेला आहे. तो चुनावी जुमला होता, असे लोकांना समजलं आहे आणि त्यामुळे लोक आता आम्हाला हमखास साथ देतील, असाही विश्वास प्रफुल पटेल यांनी यावेळी व्यक्त केला.

एससी, एसटी प्रवर्ग आरक्षणाच्या अटी संदर्भात पटेल काय म्हणाले?

एसटी आणि एसटी प्रवर्गातील आरक्षणावर अटी लावण्यात आल्या आहेत. या विरोधात 21 ऑगस्टला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यावरून प्रफुल्ल पटेल यांना प्रश्न केला असता कोणाच्याही भावनांच्या विरोधात जाऊन आम्ही निर्णय करणार नाही. आम्ही तो विषय समजून घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एससी, एसटी खासदारांचे शिष्टमंडळ गेलं होतं. त्यांनीही आम्ही कुठलीही पुढची कारवाई करणार नाही, असं आश्वस्त केले असल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितलं.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.