प्रकाश आंबडेकर विरोधात त्यांचा पुतण्या, मनोज जरांगेच्या साथीने विधानसभेच्या आखाड्यात

Rajratna Ambedkar Manoj Jarange Patil assembly Election 2024: राजरत्न आंबेडकर यांनी राज्यातील 29 राखीव जागा लढवण्याबाबत मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. ते स्वत:ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आपण कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार हे येत्या दोन ते तीन दिवसात ठरणार आहे.

प्रकाश आंबडेकर विरोधात त्यांचा पुतण्या, मनोज जरांगेच्या साथीने विधानसभेच्या आखाड्यात
rajratna ambedkar manoj jarange patil
Follow us
| Updated on: Oct 26, 2024 | 12:55 PM

Rajratna Ambedkar Manoj Jarange Patil assembly Election 2024: महाराष्ट्रातील राजकारणात विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या उलथापालथी होत आहेत. बाप-लेक, काका पुतणी, काका-पुतण्या अशा लढती होत आहे. आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारातून दोन वेगळे विचार समोर येत आहे. बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राजकारणात आहे. आता त्यांचे चुलते अन् पुतणे असलेले राजरत्न आंबेडकर विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहे. त्यासाठी त्यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी युती केली आहे.

काय आहे राजरत्न आंबेडकर यांचा डाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी राजरत्न आंबेडकर यांनी राज्यातील 29 राखीव जागा लढवण्याबाबत चर्चा झाली. ते स्वत:ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आपण कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार हे येत्या दोन ते तीन दिवसात ठरणार आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.

कोण आहे राजरत्न आंबडेकर

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सख्ये बंधू आनंदराज आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर आहे. ते अशोक आंबडेकर यांचे पुत्र आहे. राजरत्न यांनी उच्चशिक्षण घेतले आहे. वित्तीय व्यवस्थापनात त्यांनी पीएचडी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे ते चुलते अन् पुतणे आहेत. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून राजरत्न आंबेडकर सामाजिक कार्यरत कार्यरत होते. नुकतीच त्यांनी आरपीआय पक्षाची स्थापना केली असून राजकारणात सक्रिय झाले आहेत. दोन वर्षांपासून उत्तर प्रदेश बहुजन मैत्री संमेलनातून ते दलितांना एकत्र करण्याचे प्रयत्न करत आहेत.

हे सुद्धा वाचा

30 सप्टेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली होती. हाच पक्ष राजरत्न आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत केला आहे. राजरत्न आंबेडकर यांची संभाजीराजे यांच्याशी जवळकी आहे. राज्यात तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?.
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा.
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा.
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'.
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?.
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?.
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक.
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?.
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'.