नाभिक समाजाच्या प्रश्नांसाठी वंचितला जोरदार लढा द्यावा लागला, तेव्हा कुठे प्रशासनाला जाग आली : प्रकाश आंबेडकर
"सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधक कोणीही बारा बलुतेदारांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही", असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला (Prakash Ambedkar on Thackeray government).
अकोला : “सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधक कोणीही बारा बलुतेदारांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही (Prakash Ambedkar on Thackeray government). लॉकडाऊनदरम्यान कुंभार आणि नाभिक समाजाच्या प्रश्नांसाठी वंचितला जोरदार लढा द्यावा लागला, तेव्हा कुठे प्रशासनाला जाग आली”, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले (Prakash Ambedkar on Thackeray government).
“कुंभार आणि नाभिक समाजापाठोपाठ आता मच्छीमारांचा प्रश्नदेखील बिकट झाला आहे. सध्या मच्छीमार नसलेल्या बोगस सोसायट्यांना मच्छिमारी करण्याचे ठेके दिले जात आहेत. मात्र, जे कोळी बांधव परंपरागत मच्छीमारी करीत आले आहेत त्यांनाच मच्छिमारीचा ठेका देण्यात यावा”, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
हेही वाचा : सलून सुरु करण्यास परवानगी, केवळ केस कापता येणार, दाढी नाही!
‘बोगस सोसायट्यांना मच्छीमारीचे ठेके’
“राज्यातील तलाव, बंधारा किंवा नदीकाठचा भाग हा ठेके पद्धतीने मच्छिमार बांधवांना मच्छीमारीसाठी दिला जातो. मात्र गेल्या काही वर्षात मच्छिमारी व्यवसायासोबत ज्याचा काडीमात्र संबंध नाही, असे लोक बोगस सोसायट्या तयार करुन प्रशासनाकडून मच्छीमारीचा ठेका घेतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने मच्छिमारी व्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांवर अन्याय होतो”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा बोगस लोकांचा ठेका बंद करावा. कोळी बांधवांना मच्छिमारी करण्यासाठी ठेके देण्यात यावे”, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्याचबरोबर “कोळी बांधवांच्या प्रश्नांचा प्रशासन गांभीर्याने विचार करेल”, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!