मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता : प्रकाश आंबेडकर

राज्यमंत्री बच्चू कडू स्वत: बाईकवर दिल्लीला गेले आणि शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. मात्र, यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे (Prakash Ambedkar Slams Bachchu Kadu over Farmers Protest).

मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता : प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 5:26 PM

नागपूर : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर (Farmers Protest) गेल्या 26 दिवसांपासून पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात आता देशभरातील शेतकरी सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला राज्य सरकारने पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर राज्यमंत्री बच्चू कडू स्वत: बाईकवर दिल्लीला गेले आणि शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. मात्र, यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे (Prakash Ambedkar Slams Bachchu Kadu over Farmers Protest).

“मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नाही. एकतर मंत्री राहा नाही तर आंदोलन करा. मी मुख्यमंत्री असतो तर राजीनामा मागितला असता”, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली.

“महाराष्ट्र् सरकारने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र तो फक्त तोंड देखला आहे. पंजाब सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकार देखील का कायदा करत नाही? अधिवेशनाचे दोन दिवस कांजूरमार्ग आणि कंगनावर गेले. शेतकऱ्यांना वेळच नाही. अधिवेशन नाही तर आम्ही काय करायचं? अस सांगितलं जातं. दोन दिवसांच्या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी कायदा तयार केला नाही”, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

“भाजप घटनाबाह्य वागत आहे, असा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून करण्यात येत आहे. मात्र, हे तीन पक्षदेखील घटनाबाह्य वागत आहेत”, अशी टीका त्यांनी केली (Prakash Ambedkar Slams Bachchu Kadu over Farmers Protest)..

“आरएसएस, भाजप यांची मांडणी पूर्णपणे हुकमशाह पद्धतीची आहे. हे दिल्लीच्या आंदोलनावरून दिसून येते. शेतकरी थंडीत बसले आहेत. मात्र सरकार निर्णय घेत नाही. आम्ही कायदा केला तुम्ही मान्य करा, अशी भूमिका आहे. शेतकऱ्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि पाठिंबा देतो. हे तीन कायदे आल्यानंतर सरकारी खरेदी संपली असेल”, असं आंबेडकर म्हणाले.

“सरकार खरेदी करणार नाही मग फूड सिक्युरिटीचं काय होणार? फूड सिक्युरिटी द्यायची नाही अशी सरकारची भूमिका दिसते. शासन खरेदी करणार नसेल तर नागरिकांना सबसिडीचं अन्नधान्य मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी जगायचं कसं? हा प्रश्न निर्माण होणार आहे”, असं मत त्यांनी मांडलं.

वंचित ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी होणार

“आज पूर्व विदर्भातील अॅक्टिव्ह कार्यकर्त्यांचं शिबीर घेण्यात आलं. ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनल कसं करायचं यावर मंथन झालं. वंचित बहुजन आघाडीच्या नावाने आमचे उमेदवार असतील. आम्ही ग्रामपंचायत ताकतीने लढणार आहोत”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितली. त्याचबरोबर “ग्रामपंचायतमध्ये ओबीसी संदर्भात लॉटरी सिस्टम लावण्यात आली आहे. त्याची अंमलबाजानी जिल्हाधिकाऱ्यांनी करायची आहे”, असंदेखील त्यांनी सांगितलं.

हेही वाचा : कोरोना विषाणूत 17 वेळा बदल, नव्या स्ट्रेनविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नागरिकांना काय सांगितलं?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.