महाविकास आघाडीतील पक्ष श्रीमंत मराठ्यांचे… सध्याचा वाद गरीब अन् श्रीमंत मराठ्यांचा, बळी मात्र… प्रकाश आंबेडकर
माझ्या राजकारणाच्या 40 वर्षात एकमेकाला संपवण्याची भाषा कधीच झाली नाही. महाराष्ट्रात सध्याची एकमेकांना संपवण्याची भाषा सुरु आहे. ते अत्यंत दुर्दैवी आहे, असे प्रकाश आंबडेकर यांनी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर म्हटले आहे.
राज्यात सध्या गरीब आणि श्रीमंत मराठा वाद सुरु आहे. श्रीमंत मराठ्यांनी महाविकास आघाडीतील पक्ष काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यामधील पुढाऱ्यांना विकत घेतले आहे. सत्ता त्यांनी स्वता:कडे कबीज केली आहे. ही तिन्ही पक्ष श्रीमंत मराठ्यांचे आहे. राज्यात सध्या जे भांडण सुरू आहे. ते गरीब आणि श्रीमंत मराठ्यांचे सुरू आहे. त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा बळी दिला जात आहे असे मी मानतो. यामुळे आम्ही त्या आघाडीतून बाहेर पडलो, असे वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
100 ओबीसी आमदार निवडून आणा
गरीब मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांना नेहमी आव्हान देऊ नये. येत्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर श्रीमंत मराठे ओबीसींची जात निहाय जनगणना मान्य करून घेतील. तसेच जात जनगणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तो पर्यंत ओबीसी आरक्षण थांबवा, असे मराठे म्हणतील. यामुळे मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी बारगडून जाईल. त्यामुळे आम्ही म्हणतोय किमान 100 ओबीसी आमदार निवडून आणा.
कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याबात…
कुणबी ओबीसीमध्ये आहेत. ज्या कुणबी माणसाकडे कागदपत्रे आहेत, त्याला प्रमाणपत्र मिळणे हा त्याचा संविधानिक अधिकार आहे. मात्र तुम्ही घाई गडबडीत जे कुणबी प्रमाणपत्र वाटप करत आहेत, ते त्यांनी मागील देत का. त्यांनी तुमच्याकडे मागितलेच नाही. तुम्ही राजकारणासाठी देताय, ते थांबवा अशी आम्ही मागणी केली, असे प्रकास आंबडेकर यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अमान्य
आरक्षणात आरक्षण यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अर्ध्या निकालाचे मी स्वागत करतो. एससी, एसटी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय आम्हाला मान्य नाही. आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचा निर्णय हा घटनाबाह्य आहे. सुप्रीम कोर्टाने नॉन क्रिमिलियरचा मुद्दा जो विचारात घेतला त्याला देखील आमचा विरोध आहे. सुप्रीम कोर्ट पॉलिसी डिसिजन करू शकत नाही. सुप्रीम कोर्टाने जुडीशियलच्या बाहेर गेले आहे. सुप्रीम कोर्टाने आपले दिलेले जजमेंट रिकॉल करावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे,
बघून घेईन भाषा कधी पाहिली नाही
माझ्या राजकारणाच्या 40 वर्षात एकमेकाला संपवण्याची भाषा कधीच झाली नाही. महाराष्ट्रात सध्याची एकमेकांना संपवण्याची भाषा सुरु आहे. ते अत्यंत दुर्दैवी आहे, असे प्रकाश आंबडेकर यांनी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर म्हटले आहे.