मोठा ट्विस्ट… सांगलीत बंड होणार?, प्रकाश आंबेडकर कुणाला देणार पाठिंबा?; एका विधानाने मोठी चर्चा

आपली चळवळ भक्कम राहिली पाहिजे. काँग्रेसवाले कितीही म्हणाले तरी आज त्यांची लढण्याची ताकद संपली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. रामटेक लोकसभा मतदार संघाचे उमेदवार किशोर गजभिये यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

मोठा ट्विस्ट... सांगलीत बंड होणार?, प्रकाश आंबेडकर कुणाला देणार पाठिंबा?; एका विधानाने मोठी चर्चा
Prakash AmbedkarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 13, 2024 | 5:46 PM

ठाकरे गट आणि काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यातील सांगलीचा वाद अजूनही थांबलेला नाही. सांगलीची जागा आपल्याला मिळावी म्हणून अजूनही विशाल पाटील आग्रही आहेत. विशाल पाटील यांचे बंधू प्रतिक पाटील यांनी या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यामुळे सांगलीत मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशाल पाटील बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी सांगलीच्या मुद्द्यावर उघड भाष्य केल्याने महाविकास आघाडीची सांगलीत चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रकाश आंबेडकर उमरेड येथे सभेसाठी आले होते. यावेळी त्यांनी सांगलीच्या जागेवर भाष्य करून महाविकास आघाडीला टेन्शन दिलं आहे. काँग्रेसमध्ये लढण्याची ताकद नसल्यामुळे त्यांनी ठाकरे गटा समोर नांगी टाकली आहे. सांगलीत उबाठाची उभं राहण्याच ताकद नसून काँग्रेसची ताकद आहे. प्रतीक पाटील भेटून गेले. त्यांना आम्ही पाठिंबा देऊ आणि निवडून आणू अशी ग्वाही देतो, असं विधानच प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे विशाल पाटील बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना बळ मिळत आहे.

चार दिवसांपूर्वी प्रतीक पाटील आले आणि म्हणाले की, काय करायचं? म्हटलं हिंमत असेल, तर लढा. विशाल पाटील लढले तर आम्ही तुम्हाला पाठींबा देतो. आता त्यांच्यात हिंमत आहे की, नाही पाहायचे आहे. ते लढले, तर पाठिंबाही देऊ आणि निवडूनही आणू, असंही त्यांनी सांगितलं.

मग वंचितला दोनच जागा का देत होता?

काँग्रेसच्या संविधान वाचवण्याच्या दाव्यातील हवाही प्रकाश आंबेडकर यांनी काढून टाकली आहे. काँग्रेस म्हणते, आम्हाला संविधान वाचवण्यासाठी मत द्या. मग वंचितला दोनच जागा का द्यायला निघाल्या होतात?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला. मात्र जेव्हा मी आमचा लढा उभारू असं म्हटलं तेव्हा दोन घ्या, दहा घ्या म्हणत होते. खरं म्हणजे यांना दोन पेक्षा जास्त जागा द्यायच्या नव्हता. मॅच फिक्सिंग झालेली दिसते. त्यातून आपली इंक्वायरी बंद करायची असा तर डाव नव्हता ना? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मॅच फिक्सिंग झालीय

महाविकास आघाडीची अनेक ठिकाणी मॅच फिक्सिंग झाली आहे, असा मी आरोप करतोय. रामटेकमधील काँग्रेस उमेदवाराचं कास्ट सर्टिफिकेट टिकणार नाही हे सर्वांना माहीत होतं. तरीही जबरदस्तीने उमेदवारी दिली. ऐनवेळी उमेदवारी रद्द झाल्यानंतर रश्मी बर्वे यांच्या पतीला उमेदवारी जाहीर केली. नाना पाटोले याना उमेदवारी जाहीर झाली. पण त्यांनी लढण्यास नकार दिला. का? नांदेडमध्ये जो उमेदवार दिला तो आठवड्यातून तीन दिवस डायलिसिसवर असतो. तो प्रचार करेल की तब्येत सांभाळेल. अशी अनेक उदाहरणे मी देऊ शकतो, असं आंबेडकर म्हणाले.

याचा अर्थ काय घ्यायचा?

राहुल गांधी यांनी मॅच फिक्सिंग असा शब्द वापरला. दुर्दैवाने महाविकास आघाडीने तो शब्दप्रत्यक्ष महाराष्ट्रात उतरवला असं मी मानतोय. कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेकडून उमेदवार दिला. पण एकनाथ शिंदेच्या मुलाविरोधात तो उमेदवार लढूच शकत नाही असं कल्याणचेच माणसं म्हणत आहेत. याचा अर्थ काय घ्यायचा?, असा सवाल त्यांनी केला.

म्हणून तुषार गांधींना मिरच्या झोंबल्या

शाम मानव, तुषार गांधी आरोप करत आहेत. मी अनेक नावं घेऊ शकतो की, जे म्हणत आहेत हे उभे कसे राहिले? आम्ही पक्ष म्हणून उभे राहिलो आहोत. तुम्हाला वाटत असेल की, भाजप हरली पाहिजे, तर काँग्रेसवाल्यांनो रिंगणातून बाहेर पडावं. भाजपसोबत दोन हात करून आम्ही मोकळं होवू, तुमच्यासारखे आम्ही भित्रे नाही. आम्ही मोदीची ताकद उखडून टाकायला निघालो आहोत. आम्ही त्यांना उघडे पाडत आहोत. जे तुम्ही करायला पाहिजे ते आम्ही करत आहोत, म्हणून शाम मानव आणि तुषार गांधी यांना मिरच्या झोंबायला लागल्या आहेत, असा हल्ला त्यांनी चढवला.

वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या.
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर.
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?.