Navi Mumbai : आमदार प्रशांत ठाकुरांना धक्का, पत्नीच्या नावे असलेला 300 कोटींचा भूखंड रद्द, राज्य विरुद्ध भाजप संघर्ष की विमानतळ नामकरणाचा वचपा?

भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या पत्नीच्या नावे असलेला 300 कोटींचा भूखंड रद्द करण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत. यावरुन राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकारच्या संघर्षाचा दुसरा अंक सुरु झाल्याचं बोललं जातंय.

Navi Mumbai : आमदार प्रशांत ठाकुरांना धक्का, पत्नीच्या नावे असलेला 300 कोटींचा भूखंड रद्द, राज्य विरुद्ध भाजप संघर्ष की विमानतळ नामकरणाचा वचपा?
भाजप आमदार प्रशांत ठाकूरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 2:13 PM

नवी मुंबई : महाविकास आघाडी विरद्ध केंद्र संघर्ष आपण आजपर्यंत पाहिलाय. अशातच आता राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकारच्या (Central govenment) संघर्षाचा दुसरा अंक सुरु झाला असून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप (bjp) असं चित्र सध्या राज्यात पहायला मिळतंय.  भाजप आमदार प्रशांत ठाकूर (MLA Prashant Thakur) यांना मोठा धक्का बसल्याची माहिती आहे.  प्रशांत ठाकूर यांच्या पत्नीच्या नावे असलेला 300 कोटींचा भूखंड रद्द करण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत. उलवे नोडमधील पुष्पकनगर मधील सेक्टर 26 मध्ये हा भूखंड आहे. प्रशांत ठाकूर सिडकोचे अध्यक्ष असताना 2019 मध्ये भूखंडाचे वाटप करण्यात आले होते. मात्र, आता नगर विकास विभागाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांच्या नावावरील 300 कोटींचा भूखंड रद्द केला आहे. या कारवाईनंतर राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकारच्या संघर्षाचा दुसरा अंक सुरु झाल्याचं बोललं जातंय.

भूखंड वाटप कधी?

भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर हे 2019 मध्ये सिडकोचे अध्यक्ष होते. त्यावेळी भूखंडाचे वाटप करण्यात आले होते. ठाकूर यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांच्या नावे असलेला भूखंड रद्द करण्याचे आदेश आता नगर विकास विभागाने दिले आहेत. प्रशांत ठाकूर यांना संपर्क केला असता ते कॉल उचलत नाहीयेत. आता राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकारच्या संघर्षाचा दुसरा अंक सुरु झाला असून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं चित्र सध्या राज्यात पहायला मिळतंय.

मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वचपा

मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या वाद सुरू असताना शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष होता. नवी मुंबई विमानतळाला शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं, तर भाजप आणि नवी मुंबईतील नागरिकांकडून दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी होती. त्यावेळी पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर हे देखील आंदोलनात सहभागी होते. त्यावेळी त्यांनी शिवसेना प्रश्न विचारला होता की, ‘बाळासाहेब ठाकरेंचं नाव विमानतळाला देण्याची एकनाथ शिंदे सोडून कोणीही मागणी केलेली नसतांना ‘सिडको’नं हा प्रस्ताव घाईघाईत का मांडला? असा सवाल त्यांनी त्यावेळी उपस्थित केला होता. मुंबई विमानतळाच्या नामकरणावरुन त्यावेळी राज्य सरकार विरुद्ध भाजप असा संघर्ष पहायला मिळाला होता. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेनं हा तर वचपा काढला नसावा ना, असा प्रस्न सध्या चर्चेत आहे.

इतर बातम्या

पोलीस आयुक्तावर दबाब आणणे अयोग्य, ट्रान्सफर होईपर्यंत आदेश मागे नाही; नववर्ष स्वागत समितीला पांडेय यांचे उत्तर

महाराष्ट्रात 2024 ला बहुमताचं सरकार येणार, Devendra Fadnavis यांचा गोव्यातून मविआला इशारा

VIDEO: धर्मेंद्र प्रधान यांच्या स्वप्नातली रिफायनरी Nanarमध्ये नक्कीच होणार नाही: विनायक राऊत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.