Darekar | कुटेंकडून बदल्यांचा बाजार मांडणारे खुलासे, ‘सामना’तून झिंगलेल्या मनस्थितीत लिहिलं जातंय; दरेकरांचा घणाघात!

दरेकर यांनी ‘सामना’मधील संपादकीयावरही टीका केली. ते म्हणाले, ‘सामना’ हा अर्धवेळ भाजप वर टीका करण्यातच खर्च होतो. झिंगलेल्या अवस्थेत कोण आहे, ते महाराष्ट्र पाहतोय.

Darekar | कुटेंकडून बदल्यांचा बाजार मांडणारे खुलासे, ‘सामना’तून झिंगलेल्या मनस्थितीत लिहिलं जातंय; दरेकरांचा घणाघात!
प्रवीण दरेकर.
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 12:05 PM

नाशिकः राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे अनधिकृत बदल्यांसाठी यादी पाठवायचे असा धक्कादायक खुलासा केला. या खुलाशाचा भाजपचे (Bjp) विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की, अंतर्गत काय खुलासे झाले ते आपण पाहिले नाही, पण बदल्यांचा बाजार मांडला होता त्याला पुष्टी देणारा खुलासा सीताराम कुंटे यांनी केला आहे, अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी सामनातील संपादकीयांवरही टीकास्त्र सोडले. अर्धा सामना भाजपवर लिहिण्यासाठी खर्ची घातला जातोय, असा दावाही त्यांनी यावेळी केला. शिवाय नाशिकमध्ये राजकारण्यांकडून गुंडांना आश्रय दिला जातोय. इथली गुन्हेगारी रोखण्यात पोलीस अपयशी ठरलेत. गुंड मोकाट सुटलेत. त्यामुळे इथे गुन्हेगारीकरण वाढत आहे, असा थेट आरोप दरेकर यांनी कोणाचेही नाव न घेता केला. यावरून येणाऱ्या काळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप होणार आहेत.

त्यांच्या मनात पोटसूळ उठते…

राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केलेल्या खुलाशावर दरेकर म्हणाले की, अंतर्गत काय खुलासे झाले ते आपण पाहिले नाही, पण बदल्यांचा बाजार मांडला होता त्याला पुष्टी देणारा खुलासा झाला आहे, अशी टीका त्यांनी केली. बारा आमदारांप्रकरणी सुप्रीम कोर्टने आम्हाला दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सणसणीत चपराक दिली आहे. सुप्रीम कोर्टने केवळ आदेश दिले नाहीत, तर ताशेरे ओढले आहेत. सरकारची सूडबुद्धीने कारवाई सुरू आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या मनात पोटसूळ उठत आहे. मोठा पक्ष म्हटला, तर जास्तच संपत्ती राहणार ना, असा सवालही त्यांनी केला. शिवाय प्रज्ञा ठाकूर यांचे ऐकणाऱ्यांनी त्यांचा हिंदुत्ववादी विचार जपला पाहिजे. सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेस लालूनचलन केलं जातंय. टिपू सुलतान यांनी हिंदूंची मंदिर नष्ट केली. महिलांवर अत्याचार केले. याचं प्रेम पुतणा मावशीचे असल्याचा आरोपही त्यांनी केला.

झिंगलेल्या अवस्थेत कोण?

दरेकर यांनी ‘सामना’मधील संपादकीयावरही टीका केली. ते म्हणाले, ‘सामना’ हा अर्धवेळ भाजप वर टीका करण्यातच खर्च होतो. झिंगलेल्या अवस्थेत कोण आहे, ते महाराष्ट्र पाहतोय. झिंगलेल्या मनस्थितीत लिहिलं जातंय. प्रज्ञा सिंह दारू हे औषध म्हणतात. त्यांचे ऐकायचे असेल, तर सर्वच ऐका ना. दुसऱ्या राज्यांचे बोलण्यापेक्षा आपल्या राज्याच बघा. तुम्ही त्या राज्यात आंदोलन करा. तुमचा राष्ट्रीय पक्ष होऊ पाहतोय, असा चिमटाही त्यांनी काढला. शिवाय आदित्य हे उत्तर समर्पक नसले की ते उत्तर देत नाहीत. त्यांच्या लाईनवर काय बोलणार, असा सवालही त्यांनी केला.

वाईन निर्णयाची मखलाशी…

नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्याचा खून झाला. त्या आठवड्यात सलग तीन खुनांनी नाशिक हादरले. त्यानंतरही खून, चोरी आणि दरोड्यांचे प्रकार सुरूच आहेत. नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनातही गाजला. आता प्रवीण दरेकरांनी त्याच मुद्यावरून पुन्हा एकदा सत्ताधारी नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे. दरेकर यांनी यावेळी वाईन विक्रीच्या निर्णयावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, या सरकारचे डोके ठिकाणावर नाही. वाईनचा निर्णय घेतला. त्याची वरून मखलाशी करणे सुरू आहे. दारू निर्मात्यांसाठी हे पाप असून, दारू विक्रीचा नवा अध्याय रचला जातोय, असा आरोपही त्यांनी केला.

इतर बातम्याः

Nivruttinath | 800 वर्षांपूर्वी संजीवन समाधी, यशापासून निवृत्ती, ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू; संत निवृत्तीनाथांची यात्रोत्सवानिमित्त अनोखी ओळख!

Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?

Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.