मुंबई, ठाण्यातील शाळा बंद, मग उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी-पालकांची काळजी सरकारला नाही का? भाजपचा सवाल

राज्यात एकाच क्षेत्रात दोन वेगळे निर्णय होऊ शकत नाहीत. मुंबई आणि ठाण्यातील शाळा बंद असतील तर तिथल्या विद्यार्थ्यांची काळजी आपण घेतो. मग उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांची काळजी सरकारला नाही का? असा सवाल दरेकरांनी विचारला आहे.

मुंबई, ठाण्यातील शाळा बंद, मग उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी-पालकांची काळजी सरकारला नाही का? भाजपचा सवाल
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 10:47 AM

उस्मानाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निर्देशानुसार २३ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील शाळा सुरु होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र उस्मानाबादसह अन्य जिल्ह्यातील शाळा सुरु होणार असल्याची माहिती मिळतेय. त्यावरुन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. (Praveen Darekar’s question to the state government on the issue of starting a school)

राज्यात एकाच क्षेत्रात दोन वेगळे निर्णय होऊ शकत नाहीत. मुंबई आणि ठाण्यातील शाळा बंद असतील तर तिथल्या विद्यार्थ्यांची काळजी आपण घेतो. मग उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांची काळजी सरकारला नाही का? असा सवाल दरेकरांनी विचारला आहे. विद्यार्थी आणि पालकांचे समाधान होईपर्यंत शाळा सुरु करणं योग्य नसल्याचं मत दरेकरांनी व्यक्त केलं आहे. सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याची टीकाही दरेकरांनी केलीय.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत शाळा बंद

मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. याशिवाय ठाणे आणि पनवेलमधील शाळाही बंद राहणार आहेत. त्यानुसार येत्या 31 डिसेंबरपर्यंत मुंबई, ठाणे, पनवेलमधील शाळा बंदच ठेवण्यात येणार आहेत.

कोणत्या जिल्ह्यात शाळा सुरु, कुठे बंद?

  • मुंबई, ठाणे, पनवेल – 31 डिसेंबरपर्यंत बंद
  • नाशिक – रविवारी अंतिम निर्णय
  • पुणे – अद्याप कोणताही निर्णय नाही
  • अहमदनगर – 23 नोव्हेंबरपासून सुरु
  • नागपूर – शाळा सुरु होणार
  • कोल्हापूर – शाळांचं सॅनिटायझेशन सुरु
  • रत्नागिरी- अद्याप कुठलाही निर्णय नाही
  • सिंधुदुर्ग- अद्याप कुठलाही निर्णय नाही
  • रायगड – पनवेल वगळून 23 तारखेपासून शाळा सुरु
  • सोलापूर – सोमवारपासून शाळा सुरु
  • औरंगाबाद – वरीष्ठ अधिकाऱ्यांकची बैठक सुरू, आज दुपारपर्यंत अंतिम निर्णय होण्याची शक्यता
  • नांदेड – अद्याप कुठलाही निर्णय नाही
  • बीड – अद्याप कुठलाही निर्णय नाही

दरम्यान, शाळा सुरु होण्यापूर्वी राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यभरात शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यात अनेक जिल्ह्यातील काही शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत.

कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षकांना कोरोना?

  • बीड – 25
  • उस्मानाबाद – 48
  • सिंधुदुर्ग – 8
  • नांदेड – 8
  • कोल्हापूर – 17
  • औरंगाबाद – 9

संबंधित बातम्या:

Maharashtra school reopening date कोणत्या जिल्ह्यात शाळा सुरु होणार आणि कोणत्या जिल्ह्यात नाही?

School Teachers Corona | उस्मानाबादेत 48, बीडमध्ये 25, कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह?

अहमदनगरमध्ये 23 नोव्हेंबर पासून नववी ते बारावी शाळा सुरु होणार, जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी

Praveen Darekar’s question to the state government on the issue of starting a school

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.