‘मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का?’ प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंना सवाल

मराठा नेते मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे उपोषण करत असताना माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत. या दरम्यान त्यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. या टीकेला आता प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

'मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का?' प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंना सवाल
प्रवीण दरेकर आणि मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Jul 22, 2024 | 3:49 PM

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. “भाजप सर्वांना सोबत नेणारा पक्ष आहे. भाजप पक्ष दलित, आदिवासी समाजाला सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणं हा भाजपचा गाभा आहे. पण सध्या जातिजातीत संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातोय”, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. मनोज जरांगे यांनी आमदार प्रसाद लाड यांच्यावर केलेल्या टीकेवरूनही प्रवीण दरेकर यांनी जरांगेंवर निशाणा साधला.

“तुम्ही मॅनेज होत नाहीत म्हणून समाज पाठीशी उभा आहे. पण तुम्हाला कुणी बोललं तर त्याला शिव्या देणं बंद केलं पाहिजे. आंदोलनामुळे डोक्यात हवा जाऊ देऊ नका. राजकारण करण्यापेक्षा समाजाच्या प्रश्नावर फोकस करा. सरकार मराठा समाजासाठी काय करतंय ते कालच्या कार्यक्रमात आम्ही दाखवलं. मराठा समाजाच्या प्रश्नी सरकार सकारात्मक आहे. आमच्या मुद्द्यांवर इतर देण्याऐवजी शिवराळ भाषा वापरणं योग्य नाही, आम्हीही 20 वर्षे राजकारणात आहोत. आम्ही संघर्षातून तयार झालो आहोत. आम्ही उत्तर देऊ शकतो. त्यांनी हमरीतुमरीची भाषा टाळावी. मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का?”, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला.

‘मी बोलेन तेच समाज या अविर्भावातून…’

“मनोज जरांगे पाटील यांनी सत्तेत यावं. त्यासाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुमचा उद्देश हा भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपवणं हा आहे का? समाज शांततेत आहे. पण मी बोलेन तेच समाज या अविर्भावातून जरांगे यांनी बाहेर पडावं. जरांगे एकप्रकारे महाविकास आघाडीचा बचाव करत आहेत. त्यांनी शरद पवारांना, उद्धव ठाकरेंना विचारावं की ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यावर भूमिका काय?”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

‘दुसऱ्याच्या घरात डोकावण्याचे काम…’

प्रवीण दरेकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेलादेखील प्रत्युत्तर दिलं. “दुसऱ्याच्या घरात डोकावण्याचे काम नाही. कुणाला सरकारमध्ये ठेवायचं आणि काढायचं ते आम्ही बघू. आपल्या पक्षातून कोण जातंय ते बघा”, असं प्रवीण दरेकर यांनी सुनावलं. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यावरही प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. “प्रत्येक नेता पक्षाला ताकद देण्यासाठी भूमिका घेतो. महायुतीबाबत भाजप आणि सहयोगी पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. विधानसभा एकत्र लढणार आहोत ते स्पष्ट आहे”, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.