नवी मुंबई पालिका निवडणुकीपूर्वीच फोडाफोडी; भाजप नगरसेवकांवर पोलिसांचा दबाव: दरेकर
नवी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. (pravin darekar meet navi mumbai police commissioner)
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. भाजपच्या नगरसेवकांविरोधात पोलीस बळाचा वापर करण्यात येत आहे, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली काम करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. (pravin darekar meet navi mumbai police commissioner)
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नवी मुंबईत भाजप नगरसेवकांवर दहशत निर्माण केली जात असल्याचं सांगितलं. महापालिका निवडणुकीपूर्वीच शहरात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. पोलीस बळाचा वापर करून नगरसेवकांवर दबाव आणला जात आहे. त्यांच्या जुन्या केसेस उकरून काढून त्यांना त्रास दिला जात आहे. साम, दाम, दंड आणि भेदाचा वापर केला जात असल्याचं दरेकर यांनी पोलीस आयुक्तांना सांगितलं.
शहरात भयाचं वातावरण आहे. येथील वातावरण गढूळ झालं आहे. नगरसेवक आणि नागरिकांमध्ये भय निर्माण होऊ नये ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यानुषंगाने पोलिसांनी पावलं उचलवीत, असं सांगतानाच पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये. सरकारच्या दबावाखाली काम करू नये, असं आवाहनही त्यांनी पोलिसांना केलं.
दरम्यान, नाशिक महापालिका निवडणुकीपूर्वीच शहरात प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहेत. गेल्या पंधरा दिवसात भाजपच्या पाच नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यापैकी तीन नगरसेवकांनी शिवसेनेत आणि दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. भाजप नेते गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला हा धक्का असल्याचं मानलं जात होतं. नगरसेवकांनी बंड केल्याने नाईकही सक्रिय झाले असून त्यांनी भाजपमधून गेलेल्यांना नांदा सौख्य भरे म्हणत टोला लगावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर दरेकर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. (pravin darekar meet navi mumbai police commissioner)
VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या pic.twitter.com/zmE4geSb6R
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 8, 2021
संबंधित बातम्या:
पाच नगरसेवकांची बंडखोरी, भाजपला धक्का; गणेश नाईक म्हणतात…
नवी मुंबईत महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी, राष्ट्रवादीच्या बैठका, भाजपला धक्का बसणार? स्पेशल रिपोर्ट
नवी मुंबईत धोकादायक इमारतीतील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, नववर्षात वाढीव FSI ची भेट
नवी मुंबईतील उद्यान घोटाळाप्रकरणी अधिकारी आणि कंत्राटदारावर निलंबनाची कारवाई
(pravin darekar meet navi mumbai police commissioner)