रस्त्यावर 6 फूट पाणी, मार्ग बंद, तरीही प्रविण दरेकर भरपावसात माणगावमध्ये, बचाव कार्याचा आढावा

माणगाव, महाड परिसाला अतिवृष्टीचा तडाखा बसल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर तातडीने रात्री उशिरा माणगावमध्ये दाखल झाले. त्यांच्या सोबत माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे आहेत.

रस्त्यावर 6 फूट पाणी, मार्ग बंद, तरीही प्रविण दरेकर भरपावसात माणगावमध्ये, बचाव कार्याचा आढावा
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 12:11 AM

महाड : माणगाव, महाड परिसाला अतिवृष्टीचा तडाखा बसल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर तातडीने रात्री उशिरा माणगावमध्ये दाखल झाले. त्यांच्या सोबत माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे आहेत. भर पावसात अतिशय खडतर प्रवास करत प्रविण दरेकर माणगाव जवळील तासगाव टोल नाक्यापर्यंत कसेबसे पोहोचले आहेत. परंतु पुढे रस्त्यावर जवळ जवळ 6 फुट पाणी असल्यामुळे मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत रेस्क्यु टीमही उपस्थित आहे. त्यांच्यासोबत दरेकर यांनी चर्चा करुन येथील पूरपरिस्थितीची व बचाव कार्याची माहिती घेतली.

रिस्क्यु टीमसोबत बचाव कार्याचा आढावा

प्रविण दरेकर म्हणाले, “बचाव दल आमच्यासोबत असून त्यांनी आम्हाला पुढे जाण्यास अटकाव केला आहे. सकाळपर्यंत पाणी ओसरल्यानंतर एनडीआरएफची टीम बोटीने पुढील प्रवास करेल. आम्ही सुध्दा एनडीआरएफ टीमसोबत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. येथे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण महाड व रायगडचा परिसर जलमय झाला आहे. यामुळे येथील नागरिकांना प्रचंड हालपेष्टांना सामोरं जावं लागत आहे.”

अतिवृष्टीमुळे पुढील मार्ग तूर्तास बंद, पूरस्थितीमुळे अनेक अडचणी

“अतिवृष्टीमुळे माणगाव, महाड येथील नागरिक घाबरले आहेत. अनेक नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी एसटीच्या टपावर बसले आहेत. महाडमधील तळा येथील गावातही दरड कोसळल्याची घटना घडली. दुसऱ्या बाजूला जलमय झालेल्या परिस्थितीत नागरिक अडकले आहेत. पण या संकटाच्या स्थितीत आम्ही त्यांच्या सोबत आहोत,” असं दरेकर यांनी सांगितलं.

हेही वाचा :

Big Breaking | महाडमध्ये दरड कोसळली, 30 घरे मातीखाली दबल्याने 72 नागरिक बेपत्ता असल्याचा अंदाज

गच्चीवरुन पूर पाहताना तोल गेला, पाण्यात पडून महाडमध्ये 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Mahad Rain | सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी, महाड शहरात 6 ते 7 फूट पाणी

व्हिडीओ पाहा :

Pravin Darekar visit Mangaon Mahad in heavy rain and flood

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.