Ramnath Kovind : हेलिपॅडला विरोध, राष्ट्रपती कोविंद रोपवेने रायगडावर येणार! संभाजीराजेंचं ट्विट
रायगडावरील होळीच्या माळावर बनवण्यात येणाऱ्या हेलिपॅडला काही शिवप्रेमींनी विरोध केला आहे. अशावेळी राष्ट्रपती कोविंद रोपवेने रायगडावर येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिसथितीत दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केली आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिलीय.
मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) 6 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांना अभिवादन करण्यासाठी किल्ले रायगडावर (Raigad Fort) येणार आहेत. मात्र, रायगडावरील होळीच्या माळावर बनवण्यात येणाऱ्या हेलिपॅडला काही शिवप्रेमींनी विरोध केला आहे. अशावेळी राष्ट्रपती कोविंद रोपवेने रायगडावर येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिसथितीत दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केली आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिलीय.
संभाजीराचे छत्रपतींचे ट्विट
संभाजीराजे यांनी ट्विट करुन वरील माहिती दिली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिसथितीत दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केली आहे. यासाठी शिवभक्तांच्या भावनेचा आदर राखत ते गडावर रोपवेने येणार आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या या शिवभक्तीस मी सल्यूट करतो’, असं ट्विट त्यांनी केलंय.
To pay his tributes to Chhatrapati Shivaji Maharaj the Hon’ble President is willing to overcome any circumstances. He has taken cognisance of the emotions of all Shivbhakts and decided to ascend the fort via Ropeway. I salute this Shivbhakti of the President.@rashtrapatibhvn
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 4, 2021
हेलिपॅडला होणाऱ्या विरोधावर संभाजीराजेंची भूमिका काय?
देशाचे राष्ट्रपती महाराजांना अभिवादन करणार असल्याने संपूर्ण जमगाचे लक्ष केंद्रीत होईल. मी महाराजांचा वंशज आहे. गडावरती काहीही चुकीचे होऊ देणार नाही. रायगडावरील रोप वे सक्षम नसल्यानेच गडावरती हेलिकॉप्टर उतरावे लागत आहे. रोप सक्षम नसल्याचा दाखला महाराष्ट्र सरकारनेच दिला आहे. त्यामुळे गडावर हेलिपॅड बनवावे लागले. होळीच्या माळावर असलेल्या महाराजांच्या पुतळ्यावर धुळ जाणार नाही याची योग्य खबरदारी घेतली आहे. शिवनेरी किल्ल्यावर हेलिकॉप्टर उतरते तेव्हा धुळ उडलेली चालते आणि रायगडावर काळजी घेतली तरी चर्चा का? असा सवाल संभाजीराजे यांनी विचारलाय.
होळीच्या माळावर हेलिकॉप्टर उतरवण्यास नेमका विरोध का?
रायगडावरील नगारखान्याच्या बाजूला होळीचा माळ आहे. तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. 1996 पूर्वीपर्यंत त्याजवळ हेलिपॅड होते. हेलिकॉप्टर उतरण्याच्या वाऱ्यानं धूळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जायची. शिवप्रेमींनी यामुळं आंदोलन करुन होळीच्या माळावरील हेलिपॅड काढायला लावलं होतं. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यावेळी हेलिपॅड होळीच्या माळावर तयार करण्याचं निश्चित झाल्यानंतर शिवप्रेमींनी विरोध केला होता. राष्ट्रपतींच्या दौऱ्यानंतर होळीच्या माळावरुन हेलिपॅड काढून टाकावे, अशी मागणी शिवप्रेमींनी केलीय. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1671 मध्ये याठिकाणी होळीचा सण साजरा केल्याचं काही अभ्यासकांचं मत आहे.
इतर बातम्या :