प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर; 14 हजार 250 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळामार्फत 12 ऑगस्ट, 2021 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व  पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या आज परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत.

प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर; 14 हजार 250 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 12:12 AM

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळामार्फत 12 ऑगस्ट, 2021 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व  पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या आज परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त एच. आय. आतार यांनी दिली आहे.

तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) परीक्षेसाठी एकूण 3 लाख 88 हजार 515 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी  3 लाख 37 हजार 370 विद्यार्थी उपस्थित होते. तर 37 हजार 871 विद्यार्थी अनुपस्थित होते. 57 हजार 334 पात्र विद्यार्थी आहेत. यापैकी 14 हजार 250 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठीही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद

तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेसाठी एकूण 2 लाख 44 हजार 314 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 10 हजार 338 विद्यार्थी परीक्षेसाठी हजर होते. तर 22 हजार 814 विद्यार्थी अनुपस्थित होते. 23 हजार 962 विद्यार्थी पात्र ठरले. त्यापैकी 10 हजार 736 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पहाता येईल अशी माहिती देखील यावेळी आतार यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Fadnavis| आपल्याच सुनेच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती विद्या चव्हाण, ‘डान्सिंग डॉल’वर अमृता फडणवीसांचं सणसणीत उत्तर

काय राव गुरुजी, तुम्हीही जुगारात? संताप व्यक्त करावा की आश्चर्य? जिल्हा परिषदेने दिला दणका!

हिंगोलीच्या रस्त्यांवर आज शुकशुकाट, प्रमुख व्यापारी बाजारपेठाही बंद, काय आहे कारण?

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.