PM Modi : पंतप्रधान मोदींची आज चाळीसगावच्या विद्यार्थ्यांशी ‘मन की बात’; पीएम आवास योजनेतील लाभार्थ्यांशीही साधणार संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची मन की बात महाराष्ट्रासाठी खास असणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या कार्यक्रमामधून देशातील नागरिकांशी सवांद साधत असतात. ते मन की बातमधून आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवतात तसेच नागरिकांची मत देखील जाणून घेतात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) पुन्हा एकदा मन की बातमधून संवाद साधणार आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही मन की बात आज महाराष्ट्रासाठी खास असणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. आज सकाळी 11 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी देखील संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शिक्षक विद्यार्थ्यांची उपस्थिती असणार आहे.
उत्सुकता शिगेला
पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमधून जनतेशी संवाद साधात असतात. आज मोदींची मन की बात विशेष असणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांशी तसेच पीएम आवासच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थ्यांसह खासदार उन्मेश पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण हे देखील उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेमकं काय बोलणार? विद्यार्थी त्याच्यांशी कसा संवाद साधणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. काही वेळातच मन की बात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
व्होकल फॉर लोकल
दरम्यान या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला खादी उत्पादनाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तुमच्याकडे कपडे खरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र सर्वजन खादी उत्पादनाला प्राधान्य द्या. सणोत्सवाच्या काळात आपल्या नातेवाईकांना खादीपासून तयारे केलेले कपडे भेट द्या. यामुळे व्होकल फॉर लोकल चळवळ अधिक मजबूत होईल. स्थानिकांच्या हाताला रोजगार उपलब्ध होईल असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा व्होकल फॉर लोकलवर बोलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.