पंतप्रधान मोदींचं जनतेला दिवाळी गिफ्ट; 29 ऑक्टोबरला करणार मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आणखी एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. ज्याला लाभ हा देशातील कोट्यवधी नागरिकांना मिळणार आहे.

पंतप्रधान मोदींचं जनतेला दिवाळी गिफ्ट; 29 ऑक्टोबरला करणार मोठी घोषणा
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Oct 27, 2024 | 7:37 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आणखी एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात देशात अनेक आरोग्यविषयक योजना सुरू करण्यात आल्या. यामध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आयोग्य योजना ही एक केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सत्तर वर्षांपर्यंत वय असलेल्या नागरिकांना मोफत उपचार मिळत होते. मात्र आता लवकरच या योजनेचा विस्तार होण्याची शक्यता आहे. आता या योजनेंतर्गत ज्यांचं वय सत्तर वर्षांपेक्षा अधिक आहे त्यांना देखील मोफत उपचार मिळणार आहेत, या योजनेच्या विस्ताराबाबत येत्या 29 ऑक्टोबरला घोषणा होण्याची शक्यता आहे.यासोबतच नियमित लसीकरणाची नोंद ठेवण्यासाटी विकसित केलेलं U-WIN पोर्टल देखील याच दिवशी लाँच केलं जाणार आहे.

येत्या मंगळवारी म्हणजेच 29 ऑक्टोबरला आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आयोग्य योजनेच्या विस्ताराची घोषणा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ज्यांचं वय सत्तर वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना देखील मोफत उपचार मिळू शकणार आहेत. सोबतच U-WIN पोर्टल देखील याच दिवशी लाँच केलं जाणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून देशातील गर्भवती महिला आणि जन्मापासून ते 17 वर्षांपर्यंत बालकांच्या लसीची प्रत्येक नोंद ठेवली जाणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 29 ऑक्टोबरला आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आयोग्य योजनेच्या विस्ताराची घोषणा होणार आहे, या योजनेच्या विस्ताराचा फायदा हा 4.5 कोटी कुटुंबांमधील तब्बल सहा कोटी नागरिकांना होणार आहे. या योजनेची व्यापकता वाढवल्यानंतर सत्तर वर्षांपेक्षा अधिक वय असलेली कोणतीही व्यक्ती या योजनेंतर्गंत उपचार मिळवण्यास पात्र असणार आहे. या योजनेंतर्गंत पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही विस्तारीत योजना 33 राज्य आणि सर्व केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यात येणार आहे. मात्र ही योजना ओडिशा, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या तीन राज्यांमध्ये लागू नसणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक सप्टेंबर 2024 पर्यंत एकूण 12,696 खासगी रुग्णालयांसह 29,648 रुग्णालय सुचिबद्ध करण्यात आली आहे.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.