Video | पंतप्रधान मोदींचा दिव्यांगांसोबत तिकीट काढून पुणे मेट्रो प्रवास; दिलखुलास गप्पांचा फडही रंगला…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम पुणे महपालिकेतील महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर ते पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी रवाना झाले. यावेळी त्यांनी दिव्यांगांसोबत मेट्रो प्रवास केला.

Video | पंतप्रधान मोदींचा दिव्यांगांसोबत तिकीट काढून पुणे मेट्रो प्रवास; दिलखुलास गप्पांचा फडही रंगला...!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोत दिव्यांगांसोबत प्रवास केला. त्यांच्याशी गप्पा मारल्या.
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 12:26 PM

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) आज पुणे (pune) दौऱ्यावर आहेत. बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचे (metro) त्यांच्या हस्ते ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन झाले. या उदघाटन सोहळ्यात त्यांनी चक्क दिव्यांगमुलांसोबत प्रवास केला. त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम पुणे महापालिकेतील महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर ते पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी रवाना झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

काय दिला संदेश?

पुणे मेट्रोचे एकूण अंतर हे 32.2 किलोमीटर आहे. आपल्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 किलोमीटरच्या पट्ट्यात प्रवास केला. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधानांनी तिकीट खरेदी केले. त्यानंतरच ते मेट्रोमध्ये जावून बसले. पंतप्रधान तिकीट खरेदी करतात म्हणजे प्रत्येकाने तिकीट खरेदी करूनच मेट्रोचा प्रवास करावा, असा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला.

कुठंपर्यंत केला प्रवास?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोचा प्रवास गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर असा केला. यावेळी त्यांच्यासोबत दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांची पंतप्रधानांनी आस्थेने विचारपूस केली. त्यांच्यासोबत त्यांनी गप्पा मारल्या. देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती आपल्यासोबत अशी गप्पा मारते, हे पाहून विद्यार्थीही भारावून गेले.

मोदी दुसरे पंतप्रधान

पुणे महापालिकेत येणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. यापूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पुणे महापालिकेत आले होते. त्यानंतर आता मोदींच्या रूपाने हा योग जुळून आला आहे. मात्र, त्यांच्या या दौऱ्याला दुसरीकडे वादाची किनार आहे. विरोधकांनी त्यांच्या दौऱ्याचा निषेध केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. या दौऱ्यात पंतप्रधान काय बोलणार, याची उत्सुकता आहे.

इतर बातम्याः

अर्थमंत्री विरुद्ध ऊर्जामंत्री वादाचा 2 लाख 50 हजार उद्योजकांना फटका, या अधिवेशनात तरी तोडगा निघणार का?

नाशिकचे संमेलन फक्त भुजबळांचे, पंचतारांकितच्या भपक्यात धोरणाचा बळी; ठाले-पाटलांचे ताशेरे

Nashik | घरांच्या किमती प्रति चौरस फूट 500 रुपयांनी महागणार; क्रेडाईचा निर्णय, कारण काय?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.