विकसित भारतासाठी विश्वकर्मा योजना रोडमॅप…मोदींनी सांगितले पारंपारिक अन् आधुनिकतेचा संगम

vishwakarma yojana: भारताच्या समृद्धीचा आधार काय होता. आपला आधार होता आपली पारंपारिक कारागिरी, त्यावेळची आपली इंजिनियरिंग, विज्ञान होतं. आपण जगातील सर्वात मोठे वस्त्र निर्माते होते. आपलं धातू विज्ञान विकसीत होतं.

विकसित भारतासाठी विश्वकर्मा योजना रोडमॅप...मोदींनी सांगितले पारंपारिक अन् आधुनिकतेचा संगम
Narendra Modi
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 1:39 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात विश्वकर्मा योजनेचा पहिल्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम त्यांनी घेतला. यावेळी त्यांनी देशातील बारा बुलतेदारांकडे कसे समुद्ध तंत्रज्ञान होते, त्याची माहिती दिली. वर्षभरात विश्वकर्मा योजनेसाठी १४ कोटींचे कर्ज दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. या कर्जातून विश्वकर्मा बंधूंनी कमाल करुन दाखवली. देशाच्या विकासाला त्यामुळे हातभार लावल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसवर त्यांनी जोरदार टीका केली.

वर्षभरात ८ लाख कारागिरांना ट्रेनिंग

विश्वकर्मा जनतेच्या जीवनात समृद्धी आणणं हे आमचं लक्ष्य आहे. या योजनेसाठी वेगवेगळे विभाग एकजूट झाले आहेत. हे अभूतपूर्व आहे. देशातील ७०० हून अधिक जिल्हे, देशातील २५० लाख ग्रामपंचायती हे सर्व या मोहिमेला गती देत आहेत. या एका वर्षात १८ वेगवेगळ्या व्यवसायतील २० लाखाहून अधिक लोकांना याच्याशी जोडलं गेलं. वर्षभरात ८ लाख कारागिरांना ट्रेनिंग दिली आहे. एकट्या महाराष्ट्रात ६० हजाराहून अधिक लोकांना प्रशिक्षण दिलं गेलं आहे.

आजच्याच दिवशी महात्मा गांधींनी अस्पृश्यतेविरुद्ध आंदोलन सुरू केलं होतं. या पार्श्वभूमीवर विश्वकर्मा योजनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. विनोबा भावे आणि गांधीजींची ही धरती आहे. ही धरती प्रेरणंचं संगम आहे. या योजनेद्वारे आपण श्रमातून समृद्धी आणली आहे.

हे सुद्धा वाचा

टेक्स्टाईल उद्योगात अनेक संधी

महाराष्ट्रात टेक्स्टाईल उद्योगात अनेक संधी आहे. ते आम्ही ओळखले. यामुळे अमरावतीत टेक्स्टाईल पार्क सुरु करत आहोत. भारताच्या टेक्स्टाईल क्षेत्राचा गौरव पुन्हा मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे. अमरावतीतील पीएम मित्र पार्क हे त्याचं द्योतक आहे. या योजनेच्या पहिल्या वर्षाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे. वर्ध्याची भूमी निवडली. केवळ ही सरकारी योजना नाही. तर भारताच्या हजारो वर्ष जुन्या कौशल्याचा विकसित भारतासाठीचा रोडमॅप आहे.

भारताच्या समृद्धीचा आधार काय होता. आपला आधार होता आपली पारंपारिक कारागिरी, त्यावेळची आपली इंजिनियरिंग, विज्ञान होतं. आपण जगातील सर्वात मोठे वस्त्र निर्माते होते. आपलं धातू विज्ञान विकसीत होतं. त्याकाळातील आपल्या मातीच्या भांड्यासह इमारतीच्या निर्मितीची सर कुणालाच करता येणार नाही. या सर्व गोष्टी बारा बलुतेदार लोकांपर्यंत पोहोचवत होते.

गॅरंटी शिवाय तीन लाखाचं कर्ज

साडे सहा लाख कारागिरांना आधुनिक साधनं दिली आहे. त्यामुळे त्यांची उत्पादकता वाढली आहे. प्रत्येक लाभार्थीला १५ हजार रुपयांचं ई व्हाऊचर दिलं जात आहे. कोणत्याही गॅरंटी शिवाय तीन लाखाचं कर्ज दिलं जात आहे. एक वर्षातच विश्मकर्मा भावा बहिणांना १४०० कोटीचं लोन दिलं आहे. प्रत्येक गोष्टीचं या योजनेतून ध्यान दिलं जात आहे. त्यामुळेच ही योजना यशस्वी होत आहे.

'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.