Nashik| मोदी सरकार झुकले, राष्ट्रवादी भवनासमोर झळकले बॅनर, कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी कायदे मागे घेतल्याच्या निर्णयाचे देशभरात कुठे टीकने तर कुठे आस्थेने स्वागत झालेले पाहायला मिळत आहे. त्याचाच प्रत्यय नाशिकमध्येही शुक्रवारी पाहायला मिळाला.
नाशिकः अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आनंदोत्सव साजरा केला. पंतप्रधान मोदी यांची आजची घोषणा म्हणजे शेतकरी बांधवांच्या एकजुटीचा विजय आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी केले. खरे तर मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केली. तेव्हाच राष्ट्रवादी भवनासमोर एकेक कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती. त्यानंतर पदाधिकारीही दाखल झाले.
शेतकरी एकजुटीचा विजय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी कायदे मागे घेतल्याच्या निर्णयाचे देशभरात कुठे टीकने तर कुठे आस्थेने स्वागत झालेले पाहायला मिळत आहे. त्याचाच प्रत्यय नाशिकमध्येही शुक्रवारी पाहायला मिळाला. राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथे ‘अखेर शेतकऱ्यांपुढे झुकले मोदी सरकार’ असे बॅनर झळकवत शेतकरी एकजुटीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने तीन कृषी कायदे कुठलीही चर्चा न होता संसदेत मंजूर केले होते. हे कायदे रद्द करावे या मागणीसाठी देशाच्या इतिहासात पहिल्यादांच एक वर्षापेक्षा जास्त काळ शेतकरी बांधवांचे आंदोलन चालू होते. आज हे कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विजय आहे. त्याचा आनंदोत्सव आज साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
फटाके फोडले, पेढे वाटले
कृषी कायदे मागे घेतल्याचा राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी फटाके फोडून व पेढे भरवून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तसेच या आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे निरीक्षक अजित घुले, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष अंबादास खैरे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाट, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार कदम, सचिन पिंगळे, विक्रम कोठुळे, प्रफुल्ल पवार, गणेश गायधनी, सुनील आहेर, राजू पवार, संदीप भेरे, विनायक कांडेकर, महेश शेळके, अक्षय कहांडळ, विशाल गायकर, अनिल पेखळे, स्वप्निल चुंभळे, किरण भुसारे, गोरख ढोकणे, आकाश पिंगळे, दिनेश धात्रक, निवृत्ती त्रिंबेकर, रामेश्वर साबळे, कुंदन ढिकले, विक्रम जगताप, दर्शन घुले, जगदीश दावल, सचिन पवार, भावेश मंडलिक, अनिल धारराव आदी उपस्थित होते.
Special Report| ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचा धगधगता अंगारमळा; संघर्ष, क्रौर्य आणि सत्तेची पोळी!https://t.co/NblnUtq1t2#agriculturallaws|#PrimeMinisterNarendraModi|#BJP|#Congress|#farmer|#farmerkillings|#farmersuicides
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 19, 2021
इतर बातम्याः
Special Report| ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचा धगधगता अंगारमळा; संघर्ष, क्रौर्य आणि सत्तेची पोळी!