अधिवेशन आणि लग्न होतात मग MPSC परीक्षा का नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारला घरचा आहेर

राज्यात अधिवेशन आणि लग्नसमारंभ पार पडतात. मग एकट्या विद्यार्थ्यांनाच शिक्षा देणे योग्य नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. | Prithviraj Chavan on MPSC exam postphone

अधिवेशन आणि लग्न होतात मग MPSC परीक्षा का नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारला घरचा आहेर
पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 4:25 PM

पुणे: राज्यात अधिवेशन, आरोग्य विभागाची भरती आणि मोठमोठे लग्नसमारंभ पार पडतात. मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा (MPSC exam) पुढे ढकलण्यात काय अर्थ आहे, असा सवाल विचारत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकासआघाडी सरकारला घरचा आहेर दिला. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आणि विद्यार्थ्यांच्यादृष्टीने अन्यायकारक असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. (Congress leader Prithviraj Chavan on MPSC exam postphone)

एमपीएससी परीक्षा लांबणीवर पडल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गुरुवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. MPSC परीक्षेबाबत अशाप्रकराची अनिश्चितता योग्य नाही. विद्यार्थ्यांनी आणखी किती दिवस अभ्यास करायचा. राज्यात अधिवेशन आणि लग्नसमारंभ पार पडतात. मग एकट्या विद्यार्थ्यांनाच शिक्षा देणे योग्य नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. हे विद्यार्थी भावी प्रशासकीय अधिकारी आहेत. ते परीक्षेच्यावेळी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करतील, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

परीक्षा झालीच पाहिजे, रोहित पवार आग्रही, सरकारच्या निर्णयाचा निषेध, सत्यजीत तांबे आक्रमक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आयोगाच्या या निर्णयाविरोधात पुण्यातील विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी आयोगाच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारला या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

एमपीएससीची परीक्षा अचनाकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पद्धतीनं अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहिजे”, अशा शब्दात सत्यजित तांबे यांनी आयोगाच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

रोहित पवारांचा पुनर्विचाराचा सल्ला

“यापुढं कोरोनामुळे कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच MPSCची परीक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री साहेब आणि अजितदादा आपण याकडं लक्ष द्यावं, ही विनंती!” असं ट्वीट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या:

Pune MPSC Student Protest LIVE | राज्यसेवा पूर्व परीक्षा लांबणीवर, पुण्यात विद्यार्थी संतप्त, विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात गोपीचंद पडळकरांची एन्ट्री; रस्त्यावर आडवं पडून जोरदार घोषणाबाजी

(Congress leader Prithviraj Chavan on MPSC exam postphone)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.