माणुसकी मेली, एकीकडे आपलं माणूस गमावल्याचं दु:ख, दुसरीकडे खासगी रुग्णावाहिका चालकांकडून लुटमार

मयताच्या टाळूवरचं लोणी खाणं, अशी म्हण आपण ऐकली आहे. एखादी व्यक्ती मेल्यानंतरही त्या व्यक्तीचा फायदाच घ्यायचा, असा या म्हणीचा अर्थ होतो. असाच काहीसा प्रकार कल्याणमध्ये बघायला मिळतोय (Private ambulance driver chagres 3500 rupees only for 600 meters distance).

माणुसकी मेली, एकीकडे आपलं माणूस गमावल्याचं दु:ख, दुसरीकडे खासगी रुग्णावाहिका चालकांकडून लुटमार
इथे ओशाळली माणुसकी, मेल्यानंतरही हा कसला छळ?
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 5:02 PM

कल्याण (ठाणे) : मयताच्या टाळूवरचं लोणी खाणं, अशी म्हण आपण ऐकली आहे. एखादी व्यक्ती मेल्यानंतरही त्या व्यक्तीचा फायदाच घ्यायचा, असा या म्हणीचा अर्थ होतो. असाच काहीसा प्रकार कल्याणमध्ये बघायला मिळतोय. कोरोना महामारीच्या या भयानक संकटात अनेक रुग्ण दगावत आहेत. कल्याणच्या आर्ट गॅलरी कोविड सेंटरमध्ये तर दररोज रुग्ण दगावत आहेत. मात्र, या कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या अनेक तक्रारी आहेत. या तक्रारींची सविस्तर माहिती तर आम्ही देऊच पण त्यापलिकडे जाऊन माणुसकी किती खालच्या थरावर गेलीय याचं जिवंत उदाहरण आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (Private ambulance driver chagres 3500 rupees only for 600 meters distance).

नेमकं प्रकरण काय?

कल्याणच्या आर्ट गॅलरी या कोविड सेंटरमध्ये अरुणा पाटील या 52 वर्षीय महिला काही दिवसांपूर्वी दाखल झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचं सोमवारी (3 मे) निधन झालं. अरुणा यांच्यासोबत कशाप्रकारे उपचार झाला हा चिंतनाचा विषय आहेच. त्यांच्यावर उपचार कशाप्रकारे करण्यात आला ते आपण बघू शकत नाही. मात्र, मृत्यूनंतरही त्यांना स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना किती हतबल व्हावं लागलं हे वास्तव त्यांच्या इतर नातेवाईकांनी डोळ्यांदेखत पाहिलं.

मृतकाला स्मशानभूमीत नेण्यासाठी रुग्णवाहिका नाही

कोविड सेंटरमध्ये रुग्ण दगावलाय. या रुग्णाच्या अंत्यविधीसाठी प्रशासनाकडून एक साधी रुग्णवाहिकेचं नियोजन होऊ शकत नाही. आर्ट गॅलरीच्या डॉक्टरांनी आमच्याकडे स्मशानात नेण्यासाठी रुग्णवाहिका नाही. तुम्ही तुमची व्यवस्था करा, असं सांगून आपल्या जबाबदारीतून पाठ फिरवली. त्यानंतर कोविड सेंटरबाहेर खासगी रुग्णवाहिका चालकांनी मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी बाजारच भरला होता. कुणी पाच हजार सांगत होतं तर कुणी सात तर कुणी काही ! बिचारे हताश झालेल्या नातेवाईकांनी अखेर साडेतीन हजारात एक रुग्णवाहिका ठरवली. विशेष म्हणजे कोविड सेंटर ते स्मशानभूमी फक्त 600 मीटरचं अंतर. पण एवढ्या अंतरासाठी साडेतीन हजार रुपये आकारले.

नातेवाईकांकडून सोशल मीडियावर आक्रोश व्यक्त

मृतक अरुणा पाटील यांच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या एका जवळच्या नातेवाईकांनी ही भीषणता फेसबुकवर मांडली. “आजपर्यंत मौत का कुवा, मौतका सौदागर एकले होते. पण मी आज कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या लालचौकी येथे मौतचा तमाशा बघितला. किती भयंकर आहे सर्व. लोक मरत आहेत आणि काही लोक फक्त कमविण्यासाठी नाही म्हणता येणार पण लुटण्याच्या तयारीत आहे. आमच्या एका नातेवाईक महिलेचे तिथे निधन झाले, तर महानगर पालिकेचे डॉक्टर सांगतात आमच्याकडे सध्या स्मशानात न्यायला रुग्णवाहिका नाही. तुम्ही तुमची व्यवस्था करा. आणि खाजगी अंबुलन्सवाले जणूकाही गिधाडा सारखे बाहेर रांगेत उभे आहेत, आणि 1 किलोमीटर स्मशानात न्यायला 5 हजार रुपये दर घेतात. किती भयंकर परिस्थिती आहे. आमचे लोक प्रतिनिधी कुठे आहेत? सर्व थांबायला हवंय”, अशा शब्दात त्यांनी व्यथा मांडली.

आर्ट गॅलरी कोविड सेंटरमध्ये अफरातफरी, दोन भाऊ गमावलेल्या पत्रकाराचा आरोप

अरुणा पाटील ज्या कोविड सेंटरमध्ये दाखल होत्या त्या आर्ट गॅलरी कोविड सेंटरमधील प्रशासनाच्या कामांबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे कल्याणचे एक पत्रकार ज्यांच्या अनेक ओळखी आहेत ते देखील आपल्या दोन भावांना या ढिसाळ कोविड सेंटरच्या कामकाजापासून वाचवू शकले नाहीत. पत्रकार जितेंद्र कानडे यांनी गेल्या तीन दिवसात त्यांच्या दोन भावांना गमावलंय. दोघी भावांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर आर्ट गॅलरी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, त्या दोघी भावांचा जीव वाचवण्यात आर्ट गॅलरीतले डॉक्टर अयशस्वी ठरले आहेत. मात्र, चर्चा वेगळी आहे. या आर्ट गॅलरीतील डॉक्टर रुग्णांकडे दुर्लक्ष करतात. योग्य प्रकारे उपचार करत नाहीत. त्यामुळेच रुग्ण मोठ्या प्रमाणात दगावत असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे.

“माझा भाऊ गेल्या सात दिवसांपासून आर्ट गॅलरित दाखल होता. मी काल संध्याकाळी डॉक्टरांशी बोललो. माझ्या भावाची तब्येत चांगली होती. तो दोन दिवसात बरं होऊन घरी येईल, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्याचं ऑक्सिजन लेव्हल काल 92 तर हार्ट लेव्हल 98 होतं. पण दुसऱ्या दिवशी अचानक कोविड सेंटरमधून फोन आला. तुमच्या भावाची प्रकृती खालावली. मी घरातून निघालो. गाडी काढली आणि कोविड सेंटरच्या दिशेला निघालो. अर्ध्या वाटेवर त्यांचा फोन आला. तुमचा भाऊ गेला”, असे बोल जितेंद्र कानडे यांचे आहेत.

आयुक्तांच्या कडक सूचना

आर्ट गॅलरीत घडणाऱ्या या घटनांची माहिती मिळाल्यानंर केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी गंभीर दखल घेतली आहे. मृतांच्या नातेवाईकांची अशाप्रकारे लूट करणाऱ्या खासगी रुग्णवाहिका चालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. दुसरीकडे काही ठिकाणी मृतसंख्या वाढत असल्याच्या गोष्टी समोर येत आहेत. पण दाखल होण्याआधीच रुग्णांची प्रकृती जास्त बिघडल्याने या घटना होत असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं (Private ambulance driver chagres 3500 rupees only for 600 meters distance ).

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.