साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर; नाशिकमध्ये अशी रंगणार मैफल!

नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. कविसंमेलन, कथाकथन, परिसंवाद अशा भरगच्च कार्यक्रमाची पर्वणी रसिकांना यानिमित्ताने मिळणार आहे.

साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर; नाशिकमध्ये अशी रंगणार मैफल!
नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचा लोगो.
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 12:36 PM

नाशिकः नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. कविसंमेलन, कथाकथन, परिसंवाद अशा भरगच्च कार्यक्रमाची पर्वणी रसिकांना यानिमित्ताने मिळणार आहे.

नाशिकमधील कविवर्य कुसुमाग्रज नगरी, मेट भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस्, आडगाव येथे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3 ते 5 डिसेंबर या तारखांना होत आहे. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली असून, स्वागताध्यक्ष नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ असणार आहेत. या संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. संमेलनपूर्व गुरुवारी 02 डिसेंबर रोजी सायं. 7.00 वा. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संमेलनस्थळी करण्यात आले आहे. शनिवार 4 डिसेंबर रोजी स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम सायंकाळी होणार आहे. तसेच संमेलन समारोपाच्या दिवशी एक विशेष सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे.

पहिला दिवस : शुक्रवार, 3 डिसेंबर शुक्रवार 03 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 8.30 वा. ग्रंथदिंडी निघेल. कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान, टिकळवाडी, नाशिक येथून निमाणी बस स्टँडपर्यंत पायी जावून तेथून वाहनांनी कविवर्य कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस्, आडगाव, नाशिकच्या प्रवेशद्वारापर्यंत जाईल. तेथून परत दिंडी पायी संमेलन स्थळापर्यंत जाईल.

ध्वजारोहण

संमेलनस्थळी सकाळी 11.00 वा. ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. दुपारी 4.00 वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर संमेलनाचे उद्घाटन होईल. प्रथा व परंपरेनुसार स्वागताध्यक्षांचे भाषण,  93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षांचा आणि उपस्थित संमेलनाच्या माजी अध्यक्षांचा सत्कार, 93 व्या संमेलनाच्या अध्यक्षांचे मनोगत आणि नवीन अध्यक्षांकडे अध्यक्षीय सूत्र प्रदान कार्यक्रम, उद्घाटकांचे भाषण, संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण होईल. सुरुवातीला स्वागत गीत, संमेलन गीत आणि अखेरीस आभार प्रदर्शन असेल.

निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन

रात्री 9 वा. निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन होईल. कवी श्रीधर नांदेडकर हे या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून सूत्रसंचलन संजय चौधरी हे करणार आहेत. या काव्य संमेलनासाठी सर्वश्री कवी दगडू लोमटे, सय्यद अल्लाउद्दीन, रवी कोरडे, प्रिया धारुरकर, मनोज बोरगावकर, वैजनाथ अनमूलवाड, भाग्यश्री केसकर, नंदकुमार बालुरे, वाल्मिकी वाघमारे, इरान शेख, किशोर बळी, दिनकर वानखेडे, अनिल जाधव, विजय शंकर ढाले, तीर्थराज कापगते, मनोज सुरेंद पाठक, विष्णु सोळंके, गजानन मानकर, मिनाक्षी पाटील, संजय कृष्णाजी पाटील, रामदास खरे, प्रविण बोकुलकर, गीतेश शिंदे, मनोज वराडे, वैभव साटम, गौरी कुलकर्णी, संगिता धायगुडे, विलास गावडे, अमोल शिंदे, अजय कांडर, विनायक कुलकर्णी, अविनाश चव्हाण, संजीवकुमार सोनवणे, विजय जोशी, अंजली बर्वे, प्रशांत केंदळे, दयासागर बन्ने, साहेबराव ठाणगे, प्रकाश होळकर, उत्तम कोळगावकर, संदीप जगताप, मिलींद गांधी, रेखा भांडारे, विष्णू भगवान थोरे, कमलाकर देसले, राजेंद्र केवळबाई दिघे, सुषमा ठाकूर, किरण काशिनाथ, दीपा मिरिंगकर, नीता शहा, प्रा. लक्ष्मण महाडिक, काशिनाथ वेलदोडे, डॉ. माधवी गोरे मुठाळ, सुशिला संकलेचा आदी कवींना निमंत्रित केलेले आहे. शिवाय या कविसंमेलनासाठी भोपाळ, गोवा आणि गुजरात या राज्यातील कवीही निमंत्रित आहेत.

दुसरा दिवस : शनिवार, 4 डिसेंबर सकाळी प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत व प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ समीक्षक डॉ. चंद्रकांत पाटील आणि राजहंस प्रकाशनाचे श्री. दिलीप माजगावकर हे घेणार आहेत. महामंडळाच्या वतीने एका ज्येष्ठ लेखक व प्रकाशक यांचा सत्कार करण्यात येतो. यावर्षी नाशिकचे ज्येष्ठ लेखक, नाटककार, कांदबरीकार मनोहर शहाणे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा सत्कार संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचा हस्ते करण्यात येणार आहे.  संमेलनात ‘संवाद लक्षवेधी कवींशी’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. लक्षवेधी कवी म्हणून सर्वश्री प्रफुल्ल शिलेदार, किशोर कदम (सौमित्र), सुचिता खल्लाळ, खालील मोमीन आणि वैभव जोशी या कवींसमवेत विश्वाधार देशमुख आणि गोविंद काजरेकर हे त्यांचा काव्यप्रवास उलगडून दाखविणार आहेत.

परिचर्चा 

दुपारच्या सत्रात ‘स्मृतीचित्रे : लक्ष्मीबाई टिळक’ या विषयावर परिचर्चा आयोजित केली आहे. या चर्चेचे सूत्रधार डॉ. एकनाथ पगार आहेत. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सुहास जोशी, रेखा इनामदार साने, डॉ. गजानन जाधव आणि डॉ. मोना चिमोटे हे सहभागी होणार आहेत.

कथाकथन 

दुपारच्या सत्रात कथाकथनाचा कार्यक्रम विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. आघाडीचे कथाकार गिरीश देसाई, विद्याधर बनसोड, बाबासाहेब परीट, राजेंद्र गहाळ हे आपल्या कथा सादर करतील. कथाकथनाचे प्रात्यक्षिक म्हणून हा साहित्य संमेलनात महत्वपूर्ण कार्यक्रम ठरणार आहे.

परिसंवाद

सायंकाळी कोरोनानंतरचे अर्थकारण व मराठी साहित्य व्यवहार या विषयावर जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून त्यामध्ये मकरंद कुलकर्णी, डॉ. आशुतोष रारावीकर, विनायक गोविलकर, डॉ. हंसराज जाधव, दीपक करंजीकर, डॉ. राहुल रनाळकर हे वक्ते म्हणून असतील. सायंकाळी गोदातिरीच्या संतांचे योगदानः रामचंद्र देखणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादामध्ये धनश्री लेले, प्रा. विवेक अलोणी, चारुदत्त आफळे, डॉ. दत्तात्रय घुमरे, गीता काटे, बिशप थॉमस डाबरे, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांस वक्ते म्हणून निमंत्रित केले आहे.

कविकट्टा

संमेलनस्थळी कविकट्ट्याचे आयोजन केले असून हा कविकट्टा सलग 2 रात्री सुरू राहणार आहे. याचे संयोजन राजन लाखे, संदीप देशपांडे आणि संतोष वाटपाडे हे करणार आहेत. महाराष्ट्रातील 700 कवी आपापल्या रचना सादर करणार आहेत.

बाल साहित्य मेळावा

साहित्य संमेलनाला जोडून यावर्षी प्रथमच बाल साहित्य मेळावा होत आहे. 4 डिसेंबर रोजी सकाळी या मेळाव्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध रंगकर्मी व लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली होणार आहे. यामध्ये सर्वश्री सूर्यकांत मालुसरे, प्रा. पृथ्वीराज तौर, संजय पेंडसे, आश्लेषा महाजन, विनोद सिंदकर, किरण भावसार, विद्या सुर्वे, संदीप देशपांडे, संजय वाघ, प्रशांत गौतम व संतोष हुदलीकर यांचा सहभाग असेल.

कला प्रदर्शन

संमेलनस्थळी नाशिकचे शिल्पकार, चित्रकार आदी कलाकारांचे वैशिष्ट्यपूर्ण असे कलाप्रदर्शनही तेथे आयोजित केले आहे. सोबतच कुसुमाग्रजनगरीमध्ये सर्व रसिक नागरिकांच्या माहितीसाठी नाशिकच्या लेखकांचे पुस्तक प्रदर्शनही भरवले जाणार आहे.

तिसरा दिवस : रविवार, 5 डिसेंबर

परिसंवाद : सकाळी ‘मराठी नाटक – एक पाऊल पुढे, दोन पावले मागे’ शफ़ाअत खान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादामध्ये वक्ते लता नार्वेकर, सर्वश्री. पराग घोंगे, डॉ. सतीश साळुंके, सुबोध भावे आणि प्राजक्त देशमुख यांस निमंत्रित केले आहे. सकाळी ‘शेतकऱ्यांची दु:स्थिती, आंदोलने, राजसत्ताचा निर्दयपणा, लेखक कलावंताचे मौन आणि सेलिब्रिटींची भूमिका ’  या भास्कर चंदनशीव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादामध्ये आ. बच्चू कडू, रमेश जाधव, मिलींद मुरुगकर व संजय आवटे यांचा सहभाग अपेक्षित आहे.

दुपारी ‘ऑनलाईन वाचन – वाङमय विकासाला तारक की मारक’ हा परिसंवाद डॉ. दिलीप धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. परिसंवादात वक्ते म्हणून श्रृतीश्री वडगबाळकर, धनंजय गांगळ, श्रीमंत माने, डॉ. विलास साळुंके,  मयूर देवकर यांचा सहभाग अपेक्षित आहे.

दुपारी साहित्य निर्मितीच्या कार्यशाळा : गरज की थोतांड – डॉ. नीलिमा गुंडी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादामध्ये वृषाली देशपांडे, डॉ. भगवान कारे, डॉ. वृंदा भार्गवे, इब्राहिम अफ़गाण, प्रा. भास्कर ढोके यांचा सहभाग असेल.

नाशिक जिल्हा विशेष परिसंवाद

नाशिक जिल्हा स्थापनेला 150 वर्ष झाली आहेत. या निमित्ताने नाशिक जिल्ह्याची वाटचाल, विकास व संकल्प या विषयावरील खास परिसंवाद जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.संमेलनाचा समारोप रविवार, 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता होईल. समारोपानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

इतर बातम्याः

गुलाबी थंडीत नाशिकमध्ये राजकीय धग; निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे प्रयोग जोरात

आनंदवार्ताः नाशिक-सुरत विमानसेवा 1 नोव्हेंबरपासून, दिल्लीसाठीही लवकरच मुहूर्त

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.