MURBAD RAILWAY : कल्याण – मुरबाड रेल्वे मार्गाला चालना, महाराष्ट्रला रेल्वे बजेटमध्ये 13,539 कोटी रुपयांची तरतूद
कल्याण ते मुरबाड व्हाया उल्हासनगर 28 किमीच्या रेल्वे मार्गासाठी रेल्वे अर्थसंकल्पात 100 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. मुरबाडकरांना मुंबईशी कनेक्शन मिळणार असल्याने या दुर्लक्षित तालुक्यातील अनेक गावांचा मोठा विकास होणार आहे.
मुंबई : मध्य रेल्वेच्या कल्याण ते मुरबाड रेल्वे मार्गाला रेल्वे बोर्डाने अखेर बुस्टर डोस दिला आहे. मात्र हा मार्ग व्हाया उल्हासनगर जाणार असल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत. मुरबाडकरांसाठी ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. कारण त्यांच्या शेजारचे सर्व तालुके रेल्वे मार्गाने जोडले गेले असले तरी मुरबाड हा दुर्लक्षित तालुका रेल्वेपासून वंचित होता. या मार्गामुळे कल्याण तालुक्यातील अनेक गावेही जोडली जाणार आहे. आता या मार्गाला रेल्वेच्या अर्थसंकल्पात थेट शंभर कोटी मिळाल्याने हा मार्ग बांधण्याचे काम लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
रेल्वे अर्थसंकल्पात कल्याण ते मुरबाड व्हाया उल्हासनगर 28 किमीच्या रेल्वे मार्गासाठी 100 कोटी रूपयांची तरतूद झाली आहे. रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्राला यंदा 2023-24 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी 13,539 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. साल 2009-14 दरम्यान महाराष्ट्राला दरवर्षी देण्यात आलेल्या सरासरी 1171 कोटी रुपयांच्या तुलनेत ही रक्कम जवळपास 11 पट अधिक असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.
मुरबाड आणि कल्याण दरम्यानच्या गावांचा विकास झालेला असला तरी या कल्याण ते मुरबाड रेल्वे मार्ग गेली पन्नास वर्षे रखडला होता. स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनेकदा सरकार दरबारी मागणी करूनही रेल्वेसेवा कागदावरूनही पुढे सरकली नव्हती. परंतू कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाला मंजुरी देत भरीव तरतूद केली असली मात्र हा मार्ग ज्या भागातून दाखविण्यात आला आहे तो मार्ग पन्नास वर्षातही कुणालाही अपेक्षित नव्हता असे म्हटले जात आहे.
उल्हासनगरला का जोडले
रेल्वेने या मार्गाला मंजुरी देताना कल्याण-विठ्ठलवाडी-उल्हासनगरमार्गे मुरबाड हा मार्ग जाणार असल्याचे म्हटले आहे. कल्याण-मुरबाडमार्गे अहमदनगर अशी रेल्वेसेवा व्हावी अशी मागणी आजही व्हावी आहे. मात्र या रेल्वे मार्ग बदलण्याचे प्रयत्न गेल्या चार वर्षात झाले. मुरबाडकडे येणारी रेल्वेसेवा टिटवाळामार्गे वळवावी अशीही मागणी झाली होती, परंतू हा मार्ग आता व्हाया उल्हासनगर जाणार आहे.
कल्याण- मुरबाड रेल्वेमार्गावरील स्थानके
कल्याण- मुरबाड रेल्वेची महत्वाची ठरणार आहे. मुरबाड हा एकमेव असा तालुका आहे की त्याच्या चारही बाजूला असलेले तालुके हे रेल्वेने जोडले गेले आहेत. कल्याण, कर्जत, शहापूर आणि अंबरनाथ या चारही तालुक्यांमधून रेल्वे गेली आहे. मात्र एकमेव मुरबाड तालुका हा रेल्वे सेवेपासून वंचित राहिला होता. कल्याण- मुरबाड रेल्वे मार्गाला साल 2016 मध्ये तत्वत: मंजूरी दिली होती. २८ किमीच्या या मार्गाला एकूण 857 कोटी रूपयांची गरज आहे. या मार्गावर Kalyan, Shahad, Ambivli, Kamba Road, Apti, Mamnoli, Potgaon and Murbad अशी स्थानके असणार आहेत.
नगरला रेल्वेने केव्हा जाेडले जाणार
मुरबाडकरांना मुंबईशी जोडण्यासाठी वेगवान आणि स्वस्त प्रवासी साधन मिळाल्याने मुंबईचा विस्तार आता मुरबाड, शहापूरपर्यंत होणार आहे. यासाठी 50 वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. हा मार्ग झाल्याने आता भविष्यात नगरलाही हा मार्ग जोडला जाईल अशी अपेक्षा आहे. रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली होती. ही मागणी होती कल्याण – मुरबाड मार्गे नगरला जोडणारी रेल्वेसेवा व्हावी ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र ती सर्वेक्षणापुरतीच मर्यादीत राहिली आहे.