‘रास्ता रोको’तून केंद्राला संदेश…आता संसदेत जाऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडणार

Sharad Pawar protests on onion | कांद्याच्या प्रश्नावर आंदोलनासाठी शरद पवार सोमवारी स्वत: रस्त्यावर उतरले. आंदोलन केल्याशिवाय दिल्लीला जाग येत नाही, आजच्या आंदोलनामुळे दिल्ली सरकारची झोप उडाली असणार असे शरद पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

'रास्ता रोको'तून केंद्राला संदेश...आता संसदेत जाऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडणार
कांदा निर्यात बंदीविरोधात आंदोलनात बोलतना शरद पवारImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 11, 2023 | 1:30 PM

चंदन पूजाधिकारी, नाशिक | 11 डिसेंबर 2023 : नाशिक जिल्हा देशात शेतीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. जिल्ह्यातील शेतकरी घाम गाळून काळ्या आईची सेवा करतात. यामुळे देशाच्या नकाशावर नाशिकच्या शेतकऱ्यांची नोंद झाली आहे. कांद्याच्या संदर्भात केंद्राने निर्यात बंदीचा निर्णय घेतला. यामुळे आपणास रस्त्यावर उतरावे लागले. आजच्या आंदोलनामुळे दिल्ली सरकारची झोप उडाली असेल. परंतु रास्ता रोको केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही. आता आंदोलनानंतर दिल्लीश्वरांना कांद्याची निर्यातबंदी उठवावीच लागणार आहे. ‘रास्ता रोको’तून केंद्र सरकारला आज संदेश दिला. आता उद्या दिल्लीत जाऊन संसदेत शेतकऱ्यांची व्यथा मांडणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. चांदवड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर संबोधित करताना शरद पवार यांनी केंद्र सरकारवर कठोर टीका केली.

शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत नाही

शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नाही, हे दुर्देव आहे. मी कृषीमंत्री असताना कांद्याची किंमत कमी होणार नाही, हे स्पष्ट सांगितले होते. परंतु आताचे सरकार ते करु शकत नाही. यामुळे कांद्याची किंमत वाढताच निर्यात बंदी लागू केली आहे. कांद्याच्या निर्यातबंदीमुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहे. कांद्याची किंमत कमी होणार नाही, हे सरकारने स्पष्ट सांगण्याची गरज होती. जेवणात कांदा आवश्यक गोष्टी आहे. प्रत्येक मसाल्यात कांद्याचा वापर केला जातो. परंतु त्याचे दर वाढताच निर्यात बंदी केली जाते. सरकार शेतकऱ्यांचा काही विचार करणार आहे की नाही.

हे सुद्धा वाचा

नाशिकच हे करु शकणार

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान अजून दिलेले नाही. हे अनुदान देण्याची प्रक्रिया लवकर राबवा. शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी द्या, अशी मागणी शरद पवार यांनी केली. तसेच नाशिककरांना शरद जोशी यांच्या आंदोलनाची आठवण करुन दिली. शरद जोशी यांनी नाशिक जिल्ह्यातून शेतकऱ्यांची सामूदायिक शक्ती उभी केली होती. त्यांनी शेतकऱ्यांची ताकद सरकारला दाखवली. तसाच इतिहास आता घडवायचा आहे. नाशिककरांना पुन्हा सामूदायिक शक्ती दाखवावी लागणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.