न घडलेल्या घटनेचे निषेध मोर्चे धोकादायक, सरकारने गांभीर्याने घ्यावे, देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
न घडलेल्या घटनेचे निषेध मोर्चे राज्यात निघत आहेत. हे धोकादायक असून, सरकारने गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
नागपूरः न घडलेल्या घटनेचे निषेध मोर्चे राज्यात निघत आहेत. हे धोकादायक असून, सरकारने गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते शनिवारी नागपूरमध्ये बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, त्रिपुरा येथील कथित घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यात मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांनी वेगळेच वळण घेतले आहे. त्यात हिंदूंची घरे जाळजी जात आहेत. दुकाने टार्गेट केली जात आहेत. सोशल मीडियावर टाकलेल्या चुकींच्या फोटोमुळे हे मोर्चे काढण्यात येत आहेत. हे थांबायला हवे. शांतता राखणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. फडणवीस म्हणाले की, त्रिपुरामध्ये मशीद तोडल्याचे आणि जाळल्याचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चुकीच्या फोटोमुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न होत आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. न घडलेल्या घटनेवरून होणाऱ्या आंदोलना हा प्रकार सरकारने गांभीर्याने घ्यावा. खरे तर शुक्रवारनंतर शनिवारीही अमरावतीमध्ये मोर्चे निघतच आहेत. यामुळे हिंसक वळण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून मोर्चेकऱ्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केल्यानंतर पाण्याचा मारा करावा लागला. अमरावतीत चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न होत आहे. शांतता राखणे गरजेचे आहे. आम्ही कुठल्याही दंगलीचे समर्थन करत नाही. सर्वांनी शांतता पाळावी, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, अमरावतीत आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. काल घडलेल्या हिंसाचारातील दोषींवर आधी कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी येथील भाजप नेत्यांनी केली आहे. त्याशिवाय रस्त्यावर उतरलेला जमाव पांगणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. तसेच राज्यातील सरकारविरोधात सर्व पक्षांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन भाजप नेत्यांनी केले आहे.
अमरावतीत कलम 144 लागू
दरम्यान, आज अमरावतीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कलम 144 लागू केले आहे. आज सकाळी अमरावतीत मोठ्या संख्येने जमावाने रस्त्यावर उतरत घोषणाबाजी केली. तर शहरातील राजकमल चौक परिसरातील एका टपरीलाही एका जमावाने आग लावली. या टपरीतील सामान आधी काढून घेण्यात आले होते. मात्र, भर बाजारातील या टपरीला आग लावल्याने परिसरात धूर आणि आगीचे मोठे लोट उठताना दिसत होते. दरम्यान हा प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराचा वापर केला. त्यानंतर जमाव पांगला गेला.
त्रिपुरामध्ये न घडलेल्या घटनेवरून राज्यात मोर्चे निघत आहेत. या घटनेचा आम्ही निषेध करतो. सरकारने हा प्रकार गांभीर्याने घ्यावा. राज्यात शांतता राखावी. – देवेंद्र फडणवीस
(Protests in the state are dangerous, the government should take them seriously, appeals Devendra Fadnavis)
इतर बातम्याः
खासदार कोल्हेंनी एकांतवासाचं ‘अनमोल’ गुपित उलगडलं; राजकीय संन्यास की उगवतीचा सूर्य, घ्या जाणून!
Sonam Kapoor | भारतीय पोशाखातही ग्लॅमरचा तडका, सोनम कपूरचा दिलकश अंदाज पाहून चाहतेही घायाळ!#SonamKapoor | #Bollywood | #Entertainment https://t.co/QPw67BsFsS
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 13, 2021