‘सीएचएम’सह सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा सुरू

‘सीएचएम’ अर्थात शासकीय सहकारी व लेखा पदविका आणि सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षेला सुरुवात झाली असून, येत्या 25 तारखेपर्यंत हे पेपर सुरू राहणार आहेत.

‘सीएचएम’सह सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा सुरू
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 10:51 AM

नाशिकः ‘सीएचएम’ अर्थात शासकीय सहकारी व लेखा पदविका आणि सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षेला सुरुवात झाली असून, येत्या 25 तारखेपर्यंत हे पेपर सुरू राहणार आहेत.

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत ही परीक्षा घेण्यात येते. 2020 ची ही परीक्षा 23, 24 व 25 ऑक्टोबर 2021 रोजी होत आहे. नाशिक येथील के.टी.एच.एम. कॉलेजमधील मराठी हायस्कूल येथील नवीन व जुनी इमारत या परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज केले आहेत आणि ज्यांची निवड करण्यात आली आहे, असे उमेदवार पात्र ठरले आहेत. प्रवेशपत्र वेळेवर प्राप्त न झालेल्या परीक्षार्थींना फी भरलेला फॉर्म व चलनाच्या प्रतीवरुन यादीतील त्यांचे नाव तपासून पॅनकार्ड, मतदान कार्ड, वाहनचालक परवाना आदी ओळखपत्रांद्वारे परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. परीक्षार्थींना परीक्षेबाबतच्या अधिक माहितीसाठी सारडा सर्कल येथील जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांच्या कार्यालयाच्या 0253-259155 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे यांनी केले आहे. या परीक्षेत आज रविवारी ऑडिटिंग व हिस्ट्री, प्रिन्सिपल्स ॲण्ड मॅनेजमेंन्ट इन को-ऑपरेशन हा पेपर असून, उद्या सोमवारी को-ऑपरेटिव्ह लॉज ॲण्ड अदर लॉज व को-ऑपरेटिव्ह बँकींग अँड क्रेडिट सोसायटीज हा पेपर आहे.

सार्वजनिक आरोग्यची परीक्षा सुरू

नाशिक परिमंडळात आज होणारी सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा जवळपास 69 हजार उमेदवार देत आहेत. कोरोना १९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करणे निकडीचे असल्याने शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवेतील गट-क व गड-ड सर्व रिक्त पदे भरण्यास मान्यता दिलेली होती. त्यानुसार गट-क संवर्गाचे 2 हजार 739 व गट-ड संवर्गाचे 3 हजार 466 पदांची, असे एकूण 6 हजार 205 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार गट-क संवर्गाची लेखी परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 रोजी व गट-ड संवर्गाची लेखी परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येत आहे.

अडचण आल्यास येथे साधा संपर्क

उपसंचालक,आरोग्य सेवा ,नाशिक मंडळ ,नाशिक या कार्यालयात मे, न्यासा कम्युनिकेशन या कंपनीने 2 प्रतिनिधी नेमून हेल्प डेस्क स्थापन केलेले असून अडमिड कार्ड व इतर शंकाचे निरसन करण्यासाठी उमेदवारांनी 95133 15535, 72920 13550, 95135 00203 क्रमांकावर संपर्क साधावा, असेही डॉ. गांडाळ यांनी कळविले आहे. तसेच गट ड बाबतची परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 ला होणार आहे.

इतर बातम्याः

VIDEO | कारला धडकून बाईकसह तरुण गेला फरफटत, नाशकात भीषण अपघात, संतप्त जमावाने गाडी पेटवली

नाशिकमध्ये शिवसेनेचा कार्यक्रम, राऊतांच्या हस्ते उद्घाटन अन् फलकावरून चक्क उद्धव ठाकरेंचाच फोटो गायब!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.