साहित्य संमेलनात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील 50 ग्रंथाचे प्रकाशन; 26 ग्रंथ मराठी, 14 ग्रंथ इंग्रजी आणि 10 ग्रंथ हिंदी भाषेत

महाराज सयाजीराव गायकवाड यांचे ग्रंथप्रेम अजोड होते. त्यांना ग्रंथ, ग्रंथकार आणि ग्रंथालयाचा पालक आणि पोशिंदा म्हटले जायचे.

साहित्य संमेलनात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील 50 ग्रंथाचे प्रकाशन; 26 ग्रंथ मराठी, 14 ग्रंथ इंग्रजी आणि 10 ग्रंथ हिंदी भाषेत
महाराज सयाजीराव गायकवाड
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 9:30 AM

नाशिकः नाशिकचे साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण झाले आहे. अगोदर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे संमेलन गीतामध्ये नसलेले नाव. त्यानंतर संमेलन गीतामध्ये चुकीचे प्रसिद्ध केले फोटो. काही अज्ञातांचे प्रसिद्ध केलेले फोटो, असे नाना प्रकार घडले. त्यात साहित्यिक विश्वास पाटील यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप असूनही, त्यांना संमेलनात उद्घाटक म्हणून कसे बोलावले, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. या साऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनासाठी उत्सुक असणाऱ्या रसिकांसाठी एक आनंदवार्ता. या संमेलनामध्ये नाशिक जिल्ह्याचे सुपुत्र महाराजा सयाजीराव गायकवाड (Maharaja Sayajirao Gaikwad) यांच्यावरील तब्बल 50 ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी बडोदा संमेलनात त्यांच्या 12 ग्रंथांचे प्रकाशन झाले होते.

महाराजांचे ग्रंथप्रेम

महाराज सयाजीराव गायकवाड यांचे ग्रंथप्रेम अजोड होते. त्यांना ग्रंथ, ग्रंथकार आणि ग्रंथालयाचा पालक आणि पोशिंदा म्हटले जायचे. त्यांनी मोठ्या धडाडीने सामाजिक सुधारणा केल्या. शेती, उद्योग, न्याय साऱ्या क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवला. यापूर्वी त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे 12 ग्रंथांचे बडोदा संमेलनात प्रकाशन झाले आहे. आता या संमेलनातील 4 डिसेंबर रोजी प्रकाशन कट्ट्यावर त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या तब्बल 50 ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. एखाद्या व्यक्तीवर इतक्या ग्रंथांचे एकदाच प्रकाशन होणे, ही ऐतिहासिक गोष्ट म्हणावी लागेल. बडोद्याच्या राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र सरकारचा पुढाकार

महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनातर्फे या ग्रंथांचे प्रकाशन होत आहे. या ग्रंथांची पृष्ठसंख्या तब्बल 20 हजार आहे. यात 26 ग्रंथ मराठी, 14 ग्रंथ इंग्रजी आणि 10 ग्रंथ हिंदी भाषेत आहेत. या ग्रंथातून महाराजा सयाजीराव यांचे लेखन, भाषणे, पत्रव्यवहार, जगप्रवास, प्रशासन अहवाल समोर येणार आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने समितीने या ग्रंथांची निर्मिती केली आहे. समितीने गेल्या तीन वर्षांत 26,642 पृष्ठांचे 62 ग्रंथ तयार केले आहेत. महाराजा सयाजीराव ट्रस्ट आणि साकेत प्रकाशनाने 10,130 पृष्ठांचे 111 ग्रंथ व ई-बुक केले आहेत. या कामात सदस्य सचिव बाबा भांड, लेखक, संपादक, अनुवादक यांनी परिश्रम घेतले आहेत.

इतर बातम्याः

कोरोनाच्या नव्या विषाणूची धडकी, पुन्हा निर्बंधाचे चक्र सुरू होण्याची भीती, सरकारची नवी नियमावली

बायकोला मारझोड करणं कितपत योग्य? देशभरातल्या धक्कादायक सर्व्हेक्षणची जोरदार चर्चा

29 नोव्हेंबरपासून स्वस्त सोने खरेदीची संधी, किती पैसे मोजावे लागणार?

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.