Buldhana : स्मशानभूमित अघोरी पूजा, पारखेडच्या ग्रामस्थांची पळता भुई थोडी..! नेमका प्रकार काय ?

खामगाव तालुक्यातील पारखेड या गावालगतच स्मशानभूमी आहे. शनिवारी मध्यरात्री मात्र, या स्मशानभूमीच्या मध्यावर अघोरी पूजा मांडण्यात आली होती. याठिकाणी हळद, कुंकू, निंबू आणि धागेही ठेवले होते. स्मशानभूमितील वेगवेगळ्या ठिकाणी निंबु ठेवले असून त्या निंबात सुया टोचल्या घुसवण्यात आल्या होत्या.

Buldhana : स्मशानभूमित अघोरी पूजा, पारखेडच्या ग्रामस्थांची पळता भुई थोडी..! नेमका प्रकार काय ?
बुलढाणा जिल्ह्यातील पारखेडच्या स्मशानात अघोरी पूजाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 2:54 PM

बुलढाणा : आज स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात आधुनिकतेची कास धरत (Indian) देशात प्रगती झाली असली तरी आजही रुढी, प्रथा आणि परंपरा ह्या कायम आहेत. शिवाय संपूर्ण नागरिक हे (Superstition) अंधश्रद्धेतू पूर्णत: बाहेर पडले आहेत असेही नाही. त्याचे कारण बुलढाणा जिल्ह्यातील पारखेड येथे घडलेला प्रकार, या गावच्या स्मशानभूमिक कोणीतरी अज्ञातांनी अघोरी पूजा मांडली आणि ती पाहून ग्रामस्थांची घाबरगुंडी उडाली. हा काहीतरी जादूटोणा, आता गावावर संकट येणार अशा कल्पना करुन (Atmosphere of nervousness) घबराहटीचे वातावरण निर्माण झाले होते. गावच्या स्मशानभूमितच हा प्रकार घडल्याने तर्क- वितर्क मांडण्यास सुरवात झाली होती. दिवसभर हा गोंधळ ग्रामस्थांमध्ये होताच. अखेर अंधश्रद्धा निर्मूलण समितीचे किशोर वाघ यांनी यासंबंधी सखोल चौकशी करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे पोलीस आता काय कारवाई करतील हे पहावे लागणार आहे.

नेमका प्रकार काय घडला?

खामगाव तालुक्यातील पारखेड या गावालगतच स्मशानभूमी आहे. शनिवारी मध्यरात्री मात्र, या स्मशानभूमीच्या मध्यावर अघोरी पूजा मांडण्यात आली होती. याठिकाणी हळद, कुंकू, निंबू आणि धागेही ठेवले होते. स्मशानभूमितील वेगवेगळ्या ठिकाणी निंबु ठेवले असून त्या निंबात सुया टोचल्या घुसवण्यात आल्या होत्या. याशिवाय निंबाच्या भोवती रांगोळी, तांदळाचे गोल रिंगण करण्यात आले होते. संपूर्ण स्मशानभूमीत ठेवलेल्या निंबाभोवती हळदी कुंकुचे रिंगण करण्यात आल्याचे निदर्शनास आले आले आहे. नेमका प्रकार काय हे समजू शकले नसले तरी या अघोऱ्या पूजेमुळे वातावरण बिघडले आहे.

गावात तर्क-वितर्क, चर्चेला उधाण

स्मशानभूमित अशा प्रकारची पूजा म्हणजे हा जादूटोणा आणि गुप्तधनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर गावच्या काही ग्रामस्थांनी हा प्रकार म्हणजे गुप्तधनासाठी बळी देण्याची प्रक्रिया असल्याचे सांगितले आहे. मात्र ही अघोरी पूजा केली कुणी ? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, पारखेड ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून कारवाईची मागणी

पारखेड मधील प्रकार म्हणजे अंश्रद्धेला खतपाणी घालणारा आहे. आत्याधुनिक जगात प्रगतीची कामे होत असतानाच अशा या घटनांमुळे देशाच्या विकासात खंड पडेल अशी भावना अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रवक्ते यांनी सांगितले आहे. तर ज्यांनी हा प्रकार घडवून आणला त्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे किशोर वाघ यांनी स्पष्ट केले आहे.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.