पुण्यात विमान प्रवाशांसाठी लवकरच 5 लाख चौरस फुटांचं टर्मिनल, सोयीसुविधा कशा असणार?
पुणे विमानतळ प्राधिकरणाने 5 लाख चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळ आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असलेलं इंटिग्रेटेड टर्मिनल बांधण्यात येणार आहे. या टर्मिनलमध्ये दरवर्षी 1 कोटी 90 लाख प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असणार आहे. नव्या टर्मिनलचं 61 टक्के काम पूर्ण झालं असून 2022 पर्यंत ते वापरासाठी खुलं होईल, अशी माहिती दिली आहे.
पुणे : पुण्यात विमान प्रवासी वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या इमारतीत प्रवाशांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पुणे विमानतळ प्राधिकरणाने 5 लाख चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळ आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असलेलं इंटिग्रेटेड टर्मिनल बांधण्यात येणार आहे. या टर्मिनलमध्ये दरवर्षी 1 कोटी 90 लाख प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असणार आहे. नव्या टर्मिनलचं 61 टक्के काम पूर्ण झालं असून 2022 पर्यंत ते वापरासाठी खुलं होईल, अशी माहिती दिली आहे. पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत आज विमानतळ प्राधिकरणाची बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी विमानतळ विस्तारीकरणाबाबत आढावा घेतला. (Pune Airport Terminal new building will be 5 lakh square feet)
खासदार गिरीश बापट हे मागील तीन वर्षापासून विमानतळ विस्तारीकरणाचा पाठपुरावा करत आहेत. आज पार पडलेल्या बैठकीत विमानतळ प्राधिकरणाकडून बापट यांना सविस्तर माहिती देण्यात आली. दरम्यान, बापट यांनी नुकतीच नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेून पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबत माहिती दिली होती.
पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल कसं असेल?
>> पुण्यातील नवीन इंटीग्रेटेड टर्मिनल पूर्णत: वातानुकूलित असेल.
>> दरवर्षी 1 कोटी 90 लाख प्रवाशांना सामावण्याची क्षमता
>> गर्दीच्या काळात 2 हजार 300 प्रवाशांना सेवा देता येणार.
>> नव्या इमारतीत प्रवाशांना विमानापर्यंत पोहोचवणारे 5 नवे मार्ग
>> 8 स्वयंचलित जिने, 15 लिफ्ट, 34 चेक-इन काऊंटर असतील
>> प्रवासी सामान वहन यंत्रणा, 5 कन्व्हेयर बेल्टसह अन्य अद्यावत सुविधा
>> नवं टर्मिनल पर्यावरणास अनुकूल असेल
>> खाद्यपदार्थ आणि दुकानांसाठी 36 हजार चौरस फूट जागा
>> पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था
>> अत्याधुनिक सुविधा असलेली प्रसाधनगृहे
देशातील सर्वाधिक नफा कमावणारं विमानतळ
कोरोनाकाळातही पुणे विमानतळाच्या व्यवसायात बरकत कायम राहिली आहे. गेल्या आर्थिक वर्षात पुणे विमानतळाच्या व्यवसायात 16.09 कोटी, जुहू विमानतळ 15.94 कोटी, श्रीनगर विमानतळ 15.94 कोटी, पाटणा विमानतळ 6.44 कोटी आणि कानपूर विमानतळाच्या व्यवसायात 6.07 कोटी रुपयांचा फायदा झाला. श्रीनगर आणि कानपूरच्या विमानतळाचा कारभार सध्या भारतीय हवाई दलाकडे आहे. कोरोनाकाळातही पुणे विमानतळाच्या व्यवसायात बरकत कायम राहिली आहे. पुणे विमानतळाचा कारभार सध्या AAI अर्थात एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाकडे आहे. कोरोनामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या विमानतळांच्या यादीत मुंबई अग्रस्थानी आहे. गेल्या आर्थिक वर्षात मुंबई विमानतळाच्या व्यवसायात 384.81 कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर चेन्नई 253.59 कोटी, त्रिवेंद्रम 100.31 कोटी, अहमदाबाद 94.1 कोटी या विमानतळांचा समावेश आहे.
इतर बातम्या :
खेड पंचायत समितीवर राष्ट्रवादीचाच वरचष्मा, बहुमत असूनही शिवसेनेला जबर धक्का!
भटक्या समाजासाठी मोदींच्या पाया पडू, बावनकुळेजी घेऊन चला: विजय वडेट्टीवार
Pune Airport Terminal new building will be 5 lakh square feet