Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Bus Rape Case: ‘तो सतत माझ्या मैत्रीणींचे…’, आरोपीच्या गर्लफ्रेंडकडून धक्कादायक खुलासा

Pune Bus Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अखेर ठोकल्या बेड्या... आरोपीच्या आई, वडिलांची चौकशी सुरु, त्याच्या गर्लफ्रेंडकडून पोलिसांना मिळाली धक्कादायक माहिती, पोलीस याप्रकरणी करत आहेत कसून चौकशी...

Pune Bus Rape Case: 'तो सतत माझ्या मैत्रीणींचे...', आरोपीच्या गर्लफ्रेंडकडून धक्कादायक खुलासा
Follow us
| Updated on: Feb 28, 2025 | 9:09 AM

Pune Bus Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात रोज नवीन अपडेट समोर येत आहेत. घटना घडल्याच्या 72 तासात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठेकल्या आहेत. 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने पीडितेला जीवेमारण्याची धमकी दिली आणि तो फरार झाला. मिळालेल्या माहितीनुसार, 37 वर्षीय आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला शिरूर, पुणे येथून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

सांगायचं झालं तर, दत्तात्रय रामदास गाडे याने केलेला बलात्काराचा पहिला गुन्हा नाही. याआधी देखील त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांना दत्तात्रय रामदास गाडे याचे आई – वडील आणि गर्लफ्रेंडची देखील चौकशी केली आहे. चौकशीत आरोपचीच्या गर्लफ्रेंडने धक्कादायक खुलासा केला आहे.

पोलिसांच्या चौकशीत आरोपीच्या गर्लफ्रेंडकडून धक्कादायक खुलासा…

आरोपीची गर्लफ्रेंड म्हणाली, ‘दत्तात्रय रामदास गाडे सतत माझ्या मैत्रीणींचे मोबाईल नंबर मागायचा. त्याला सतत माझ्या मैत्रीणींबद्दल जाणून घ्यायचं असायचं… त्याने अनेक तरुणींना त्रास दिला आहे…’ असा धक्कादायक खुलासा आरोपीच्या गर्लफ्रेंडने केला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, आरोपी गाडे याच्यावर यापूर्वी चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग यांसारखे गुन्हे दाखल आहेत. 2019 मध्ये एका गुन्ह्यात आरोपीची जामिनावर सुटका झाली होती. आता बलात्कार प्रकरणी आरोपील अटक झाली असून शुक्रवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.

पुणे अत्याचार प्रकरणात 40 जणांची चौकशी करण्यात आली आहे. एवढंच नाही तर, आरोपीची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षिस देखील घोषित करण्यात आलं होतं. अखेर आरोपी दत्तात्रय गाडे हा ऊसाच्या शेतामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रात्री दीडच्या सुमारास आरोपीला बेड्या ठोकल्या.

पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा.
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश.
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात.
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना.
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन.
लातूर मनपा आयुक्त मनोहरेंना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणणार
लातूर मनपा आयुक्त मनोहरेंना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणणार.
'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?
'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?.
गर्भवतीच्या मृत्यूस रुग्णालयच दोषी; रूपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितलं
गर्भवतीच्या मृत्यूस रुग्णालयच दोषी; रूपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितलं.
'तनिषाची मृत्यूनंतर बदनामी', भिसे कुटुंबीयांचं चाकणकरांना पत्र अन्...
'तनिषाची मृत्यूनंतर बदनामी', भिसे कुटुंबीयांचं चाकणकरांना पत्र अन्....