AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Businessman Murder : पुण्याच्या व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या, विमानाने पाटण्यात गेले ते परत आलेच नाहीत

पाटणा पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार ११ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता लक्ष्मण साधू शिंदे इंडिगोच्या 6 ई-653 विमानाने पुण्याहून पाटणाला गेले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह रस्त्यात सापडला....

Pune Businessman Murder : पुण्याच्या व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या, विमानाने पाटण्यात गेले ते परत आलेच नाहीत
Follow us
| Updated on: Apr 15, 2025 | 5:33 PM

पुण्याच्या एका व्यावसायिकाची बिहाराच्या पाटण्यात अपहरण करुन हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात हल्लेखोरांनी त्यांचा मृतदेह रस्त्यात टाकला होता. जर वेळीच ओळख पटली नसती तर बिहार पोलीस बेवारस म्हणून त्यांचा अंत्यसंस्कार करणार होते अशी धक्कादायक माहीती उघडकीस आली आहे.

पुण्याच्या कोथरुड येथील व्यावसायिक लक्ष्मण साधू शिंदे (55) यांना काही दिवसांपूर्वी कंपनीचे काही टुल्स आणि मशिनरी स्वस्तात देणार असे आमीष दाखवून ईमेलद्वारे त्यांना बिहारच्या पाटण्यात बोलावून घेतले होते. त्यामुळे लक्ष्मण शिंदे विमानाने पाटणा विमानतळावर पोहचले त्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले. सोमवारी त्यांच्या मृतदेहाला पाटणा विमानतळ पोलिसांनी त्यांचा मृतदेह जहानाबाद जिल्ह्यातून ताब्यात घेतला. जहानाबाद पोलिसांना १२ एप्रिल रोजी लक्ष्मण साधू शिंदे यांचा मृतदेह घोषी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झुमकी तसेच मानपुर गावाच्या मध्ये रस्त्यावर पडलेला आढळा होता. परंतू मृतदेहाची ओळख पटू शकली नव्हती. पोस्टमार्टेमला हा मृतदेह पाठवून दिला होता.

बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करणार होते

प्राथमिक माहीती नुसार त्यांची अपहरणकर्त्यांनी खंडणी न दिल्याने गळा दाबून हत्या केली असल्याचे उघड झाले आहे. त्यांचा मृतदेह बेवारस समजून त्यावर अंत्य संस्कार करण्याची तयारी चालू असताना पाटणा पोलिसांनी मृतदेहाची ओळख सांगितल्याने प्रक्रिया थांबवली.

हे सुद्धा वाचा

पत्नीला फोन करुन सांगितले की

लक्ष्मण साधु शिंदे हे पुणे येथील कोथरुडच्या एकलव्य कॉलेज जवळील इंद्रायणी को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी डी/01 येथे राहणारे होते. त्यांचे साडू विशाल लवाजी लोखंडे यांच्या लेखी तक्रारीनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ते पुणे पोलिसांसोबत पाटणा येथे आले होते. पाटणा पोलिसांनी सांगितले की ११ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता शिंदे इंडिगोच्या 6ई-653 विमानाने पुण्याहून पाटणाला आले होते. त्यानंतर त्यांनी पत्नीला फोन करुन सांगितले की शिवराज सागी नावाच्या व्यक्तीनी गाडी पाठविली आहे. त्याच वाहनाने झारखंडमध्ये कोल इंडिया कंपनीच्या कार्यालयात जाऊ असे त्यांनी सांगितले होते.

त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने कॉल उचलला

शिंदे यांची पत्नी रत्नप्रभा यांनी पोलिसांना सांगितले की ११ एप्रिलच्या रात्री साडे नऊ वाजता पतीच्या नंबरवर कॉल केला तर त्यांचा मोबाईल बंद झाला होता. एक तासांनी मोबाईल चालू झाला आणि मिस कॉल अलर्टचा मॅसेज पाहून त्यांना पुन्हा कॉल केला. यावेळी कोणी तरी दुसऱ्या व्यक्तीने फोन उचलला आणि शिंदे बाथरुमला गेलेत असे सांगितले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क केला असता तर फोनच बंद असल्याचे आढळले. दुसऱ्या दिवशी त्यांनी ही माहीती त्यांच्या भाऊजीं लोखंडे यांना दिली. त्यानंतर त्यांनी पुण्यात तक्रार दाखल केली. नालंदा येथील हिलसा येथे त्यांचे शेवटचे लोकेशन दिसत होते. पाटणा येथील आसपासच्या पोलिस ठाण्यांना शिंदे यांचे फोटो पाठविण्यात आले.त्यानंतर जहानाबाद पोलिसांनी संपर्क केल्याने हा प्रकार उघडकीस आला. सायबर भामट्यांनी शिंदे यांना स्वस्तात मशिनरी देतो सांगून त्यांचा पैशासाठी खून केल्याचा संशय आहे.

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.