Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात पोलिसांवर कोयत्याने हल्ला, 2 गोळ्या झाडल्या आणि…

Pune Crime: पुणे विद्येचे माहेरघर की गुन्हेगारांचं शहर...? स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर, दरोडेखोरांनी पोलिसांवर केला हल्ला, कोयत्याने हल्ला, झाडल्या 2 गोळ्या आणि..., घडणाऱ्या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण

पुण्यात पोलिसांवर कोयत्याने हल्ला, 2 गोळ्या झाडल्या आणि...
Follow us
| Updated on: Mar 03, 2025 | 11:20 AM

Pune Crime: पुणे येथील स्वारगेट बस स्टँडवरील बलात्कार प्रकरण ताजं असताना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांवर हल्ला झाला आहे. दोन दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. पोलीस आणि दरोडेखोर आमनेसामने आल्यानंतर दरोडेखोरांनी पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला आहे. पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक यांच्यावर दरोडेखोरांनी कोयत्याने हल्ला केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोन्ही पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी दरोडेखोरांवर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी दरोडेखोराच्या पायाला लागली असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यातल्या केंदूर घाटातली मध्यरात्री घडलेली ही घटना आहे.

पुण्यात सतत होणाऱ्या धक्कादायक घटना पाहता पुणे विद्येचं माहेरघर की गुन्हेगारांचं शहर…? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे येथील स्वारगेट बस स्टँडवरील बलात्कार घटनेनंतर देखली शहर हदरलं आहे.

पुणे येथील स्वारगेट बस स्टँडवरील बलात्कार

पुणे येथील स्वारगेट बस स्टँडवरील बलात्कार प्रकरणी पोलीस सध्या कसून चौकशी करत आहेत. बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस चौकीत ठेवण्याचे आदेश दिले. शिवाय त्याच्या मोबाईलची देखील चौकशी करण्यात आली. ज्यामध्ये पीडित तरुणी आणि गाडे हे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे तांत्रिक तपासणीत उघडकीस आलं आहे.

याप्रकरणी पीडित तरुणीचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. बलात्कारानंतर जीवे मारू नये म्हणून तरुणीने आरोपी दत्ता गाडेला विनंती केली. मला जीवे मारू नको अशी विनंती पीडित तरुणीने आरोपीला केली. दत्ता गाडे याने गळा दाबून जीवे मारायची धमकी दिल्यामुळे तरुणीने स्वतःच्या जीवासाठी आरोपीकडे विनंती केली. तरुणीचं गावी जायचं तिकीट ही पोलिसांकडे पुरावा जमा करण्यात आला आहे.

कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल.
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण...
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण....
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत.
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं.
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.