Pune Corona Update : पुणेकरांची चिंता वाढली, कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ! लॉकडाऊन होणार?

पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

Pune Corona Update : पुणेकरांची चिंता वाढली, कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ! लॉकडाऊन होणार?
मस्तच! पुणे सावरलं, कोरोना रिकव्हरी रेट 96 टक्क्यावर
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 3:16 PM

पुणे : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक उपाययोजना आणि स्थानिक पातळीवर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही कोरोनाचा विळखा वाढताना पाहायला मिळत आहे. त्यात पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. अशा स्थितीत पुणे शहर आणि जिल्ह्याची लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्याचंच पाहायला मिळत आहे.(Corona situation in Pune city and district worrisome)

मागील 4 दिवसातील रुग्णवाढ –

  • 21 मार्च – 2 हजार 900 नवे रुग्ण, 28 रुग्णांचा मृत्यू, 8 रूग्ण पुण्याबाहेरील.
  • 22 मार्च – 2 हजार 342 नवे रुग्ण, 17 रुग्णांचा मृत्यू, 2 रूग्ण पुण्याबाहेरील.
  • 23 मार्च – 3 हजार 98 नवे रुग्ण, 31 रुग्णांचा मृत्यू, 9 रूग्ण पुण्याबाहेरील.
  • 24 मार्च – 3 हजार 509 नवे रुग्ण, 33 रुग्णांचा मृत्यू, 9 रुग्ण पुण्याबाहेरील.

लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल

पुण्यात गेल्या काही दिवसांतील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर ती अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे पुण्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेनं होत असल्याचं बोललं जात आहे. पण महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याची स्थिती काहीशी चिंताजनक बनली असली तर लॉकडाऊन करण्यासारखी परिस्थिती नसल्याचा दावा केला आहे. पण प्रशासन मात्र लॉकडाऊनच्या मनस्थितीत असल्याचं पाहायला मिळतंय.

पुणे शहरात ऑक्सिजन बेडचा तुटवडा निर्माण झाला आहे. रोजचे बाधित आणि गंभीर रुग्णांची आकडेवारी लक्षात घेतली तर फक्त 378 बेडच शिल्लक आहेत. म्हणजे एकूण बेड्सपैकी फक्त 10 टक्के बेड शिल्लक आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रुग्णालयातील बेड्सची आकडेवारी

>> सर्वसाधारण बेड – एकूण 906, शिल्लक 249 >> ऑस्किजन बेड – एकूण 3344, शिल्लक 378 >> अतिदक्षता बेड – एकूण 322, शिल्लक 27 >> व्हेंटिलेटर बेड – एकूण 445, शिल्लक 30

पुणे शहर आणि जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 50 हजाराच्या जवळपास पोहोचली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या होणाऱ्या बैठकीत लॉकडाऊनवर एकमत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुण्यात बुधवारी 3 हजार 509 नवे रुग्ण

पुण्यात आज दिवसभरात 3 हजार 509 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 1 हजार 410 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. पुण्यात दिवसभरात 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यातील 9 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. पुणयात सध्या 26 हजार 515 जणांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 598 रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.

संबंधित बातम्या : 

Corona Update : कोरोना रोखण्यासाठी स्वतंत्र संस्था स्थापन केली जाणार? अजितदादांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Maharashtra Corona Update : 2021 मधील सर्वाधिक रुग्ण, महाराष्ट्रात दिवसभरात 31 हजार 855 जण पॉझिटिव्ह!

Corona situation in Pune city and district worrisome

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.