कात्रज दूध उत्पादक संघ निवडणूक, वेल्ह्यातील दोघांची माघार, विद्यमान संचालकांना मोठा दिलासा

पुणे जिल्हा कात्रज दूध उप्तादक संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीतून वेल्हा तालुक्यातील दोघांनी माघार घेतली आहे. यामुळे कात्रज डेअरीचे विद्यमान संचालक भगवान पासलकर हे बिनविरोध निवडून आले आहेत

कात्रज दूध उत्पादक संघ निवडणूक, वेल्ह्यातील दोघांची माघार, विद्यमान संचालकांना मोठा दिलासा
पुणे जिल्हा कात्रज दूध उप्तादक संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीतून वेल्हा तालुक्यातील दोघांची माघार
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 7:13 AM

विनय जगताप, वेल्हा, पुणे : पुणे जिल्हा कात्रज दूध उप्तादक संघाच्या (Pune District Katraj Milk Producers Association) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीतून (Election) वेल्हातील दोघा उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामुळे कात्रज डेअरीचे विद्यमान संचालक भगवान पासलकर (Bhagwan Pasalkar) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता पासलकर हे वेल्हे तालुका मतदारसंघातून बिनविरोध झाले आहेत. या मतदार संघात एकूण तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी दोघांनी माघार घेतल्याने मतदारसंघातून विद्यमान संचालक भगवान पासलकर यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला आहे. 8 मार्चपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत असून त्यानंतर केवळ भगवान पासलकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

भगवान पासलकर यांचा एकमेव अर्ज

पुणे जिल्हा कात्रज दूध उप्तादक संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीतून वेल्हा तालुक्यातील दोघांनी माघार घेतली आहे. यामुळे कात्रज डेअरीचे विद्यमान संचालक भगवान पासलकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. या मतदार संघात तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यापैकी दोघांनी माघार घेतल्याने या मतदार संघातून विद्यमान संचालक भगवान पासलकर यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला आहे. 8 मार्चपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. त्यामुळे पुढील अकरा दिवसांनी पासलकर यांच्या निवडीची केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे.

सोळापैकी तीन जागा आतापर्यंत बिनविरोध

कात्रज डेअरीच्या संचालक मंडळाच्या सोळापैकी तीन जागा आतापर्यंत बिनविरोध झाल्या आहेत. वेल्हे तालुका मतदार संघातील तीनपैकी माणिक पासलकर आणि शोभा पासलकर या दोन उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्यानं विद्यमान संचालक भगवान पासलकर यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला आहे.

याआधी हवेली तालुका मतदारसंघातून म्हस्के यांनी माघार घेतली आहे. आतापर्यंत तीन जणांनी कात्रज डेअरीच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. यामुळं आता 16 जागांसाठी 88 उमेदवार रिंगणात उरले आहेत. उमेदवारी अर्जाची 22 फेब्रुवारीला छाननी झाली, तेव्हापासून येत्या 8 मार्चपर्यंत अर्ज माघारीसाठी मुदत आहे.

संबंधित बातम्या :

नाशिकमध्ये राष्ट्रीय मतदान जागृती स्पर्धेचे आयोजन; निवडणूक विभागाकडून मिळणार रोख बक्षीस, कसे व्हाल सहभागी?

जुन्नरमध्ये सोसायटीच्या निवडणुका रंगवतायत ‘भाऊबंदकी’ तील राजकारणाचा पारा

 मनसेचा वर्धापन दिन सोहळा पहिल्यांदा मुंबईबाहेर, ठिकाणही ठरलं, राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.