पुणे : मुसळधार पावसानं पुणेकरांना चांगलंच झोडपून काढलं आहे. या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात पाणी सांचलं आहे. भुयारी मार्गात पाणी साचल्यानं तिथे असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं नागरिकांनी पाऊस थांबल्याशिवाय घराबाहेर पडू नका, तसंच घरात असाल तर बाहेर पडू नका असं आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलंय. (Heavy rains in Pune city, Pune railway station area was flooded)
पुणे शहरातील पडणाऱ्या पावसाचा प्रचंड वेग लक्षात घेता आपल्या च्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज आहेत. मी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. आपण लवकरात लवकर घरी पोहोचा आणि घरी असाल तर बाहेर पडणे टाळा, असं आवाहन मोहोळ यांनी केलं आहे.
पुणे शहरातील पडणाऱ्या पावसाचा प्रचंड वेग लक्षात घेता आपल्या @PMCPune च्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज आहेत. मी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे.
आपण लवकरात लवकर घरी पोहोचा आणि घरी असाल तर बाहेर पडणे टाळा !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 4, 2021
पुणे लगतच्या भागात सध्या 12 ते 15 किमी उंचीचे ढग साचले आहेत. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरणं, प्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात. पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबा असंही मोहोळ यांनी म्हटलंय.
अत्यंत महत्त्वाचे !
पुणे आणि लगतच्या भागांवर सध्या १२ ते १५ किमी उंचीचे ढग आहेत. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरणे, फ्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात. पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबा.#satarkalert pic.twitter.com/UiilNLxra9
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 4, 2021
दरम्यान, आज लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि रायगड जिल्ह्यात तीव्र ते अती तीव्र स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Nowcast warning at 1900Hrs 4/10: Intense to very intense spells of rain very likely to occur at isol places in the districts of Latur,Osmanabad, Sholapur,Kolhapur,Pune,Raigad nxt 3-4hrs.Possibility of thunder/lightning with gusty winds in some areas.
-IMD MUMBAI
Don’t move out pl— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 4, 2021
इतर बातम्या :
भावना गवळींची ईडी चौकशीला दांडी, हजर राहण्यासाठी मागितला 15 दिवसांचा वेळ!
केंद्रातील मोदी आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा, नाना पटोलेंचा घणाघात
Heavy rains in Pune city, Pune railway station area was flooded