AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | अगं चंपाबाई धंगेकरला जीव थोडा लाव, कसा मतांनं उधळून टाकलाय डाव… रवींद्र धंगेकरांचं नवं गाणं, तुफ्फान चर्चा

सोशल मीडियावर रॅपसाँगवरून कलाकारांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रकरण राज्यात ताजे आहे. त्यातच आता आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावरचं नवं गाणं सोशल मीडियावर धुमाकुळ घालतंय

Video | अगं चंपाबाई धंगेकरला जीव थोडा लाव, कसा मतांनं उधळून टाकलाय डाव... रवींद्र धंगेकरांचं नवं गाणं, तुफ्फान चर्चा
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 11:53 AM

प्रदीप कापसे, पुणे : कसबा पेठेचे (Kasba Peth) आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचं नवं गाणं सध्या तुफ्फान चर्चेत आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना टार्गेट करणारं हे गाणं सोशल मीडियावर धुमाकुळ घालतंय. कसबा पेठ पोटनिवडणुकीत हू इज धंगेकर असा प्रश्न विचारणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचं प्रत्यक्ष नाव न घेता तयार केलेल्या या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अगं चंपाबाई, धंगेकरला जीव थोडा लाव… मतानं कसा उधलून टाकलाय डाव… अशा ओळींतून आमदार रवींद्र धंगेकर यांचं गाणं कलाकारांनी तयार करण्यात आलंय. बाबरी मशीद प्रकरणावरून बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिकांवर वक्तव्य करून चंद्रकांत पाटील आधीच चर्चेत आलेत. तर दुसरीकडे रॅपसाँग तयार करणाऱ्या काही रॅपर्सवर पोलिसांनी कारवाई केली आहे. अशा स्थितीत आता रवींद्र धंगेकर यांच्यावर तयार केलेल्या या गाण्यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

नवा वाद पेटणार?

सोशल मीडियात आणि तरुणाईमध्ये सध्या रॅपसाँग ट्रेंडिंग असतात. त्यातच महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर भाष्य करणारे रॅपसाँग गेल्या काही दिवसांमध्ये तयार करण्यात आलेत. मात्र त्यापैकी काही रॅपर्सविरोधात कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील रॅपर राज मुंगासेविरोधात अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलाय. आता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यातील कलाकारांनी केलेल्या या गाण्यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील टार्गेट?

कसबा पेठेचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचं कौतुक करणारं आणि प्रत्यक्षपणे भाजप आणि चंद्रकांत पाटील यांना टार्गेट करणारं हे गाणं तरुणांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलंय. कसबा पेठेत रवींद्र धंगेकर यांच्या कामाला मानणारा एक मोठा समुदाय आहे. खुद्द भाजपनेदेखील हे मान्य केलंय. कसबा पेठेतील निवडणूक ही भाजप विरुद्ध महाविकास आघाडी किंवा काँग्रेस अशी नव्हती. तर भाजप विरुद्ध एकटे रवींद्र धंगेकर अशी होती. धंगेकर यांच्या कामामुळेच त्यांचा विजय झाला. मात्र पोटनिवडणुकीत भाजपनेदेखील प्रचंड जोर लावला होता. ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी धंगेकरांनी भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप केला होता. प्रचारसभांमध्ये चंद्रकांत पाटील यांनी who is Dhangekar म्हणून खिल्लीही उडवली होती.

मात्र कसबा पेठेत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आणि सोशल मीडियातून who is Dhangekar वरून जोरदार मिम्स तयार करण्यात आल्या. चंद्रकांत पाटील यांना टार्गेट करण्यात आलं. आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांना नव्या गाण्यातून अप्रत्यक्ष रितीने टार्गेट करण्यात आलंय..

गाण्याचे बोल असे…

एकजुटीनं साऱ्यांच्या मतानं कसा उधळून टाकलाय डाव… हु इज धंगेकर

अगं चंपाबाई, आमदाराला जीव थोडा लाव…

पुण्यात इतिहास घडला, एक नेता साऱ्यांना पुरून उरला

किती सभा घेतल्या, किती नोटा वाटल्या

पैसेवाल्यांना मी दावला मी दाव, असा हा रवींद्र भाव…

कसब्याचा बादशाह हाय यो, चंपाबाई…

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.